जगातील टॉप टेन कॅसिनोज

[nextpage title=”जगातील टॉप टेन कॅसिनोज”]
collarge
सुखदुःखाच्या आडव्या उभ्या धाग्याने विणलेले मानवी जीवन कंठण्यासाठी मनोरंजन अथवा करमणूकीची साधने हवीतच. चार घटका करमणूक करून घेतल्यानंतर रोजच्या धकाधकीला पुन्हा जुंपून घेण्यासाठी माणसाला ऊर्जा मिळत असे. जगभरात करमणुकीची अनेक साधने आहेत आणि कांही साधनांनी तर मोठ्या व्यवसायाचे रूप घेतले आहे. चित्रपट, संगीत, आर्ट, विविध क्रिडाप्रकार यांच्याप्रमाणेच जुगार हेही अनेकांसाठी मोठे आकर्षण असते. जुगार खेळण्याची परंपरा प्राचीन आहे. अगदी महाभारतात सुध्दा त्याचे उल्लेख आहेत. पांडवांना जुगारात हरल्यामुळेच राज्य सोडावे लागले आणि वनवास भोगावा लागला हा इतिहास आहे. पाश्चात्य संस्कृतीतही जुगार चांगलाच रूळला आहे आणि तो खेळता यावा यासाठी मोठमोठे कॅसिनोज उभारले गेले आहेत. श्रीमंत गरीब कुणालाही जुगार खेळण्याची बंदी नाही. येथे एकच वाईट असते ते म्हणजे पैसे हरणे सोपे असते पण जिंकणे कर्मकठीण. तरीही जिंकण्याच्या आशेने माणूस खेळत राहतो आणि बघता बघता राजाचा रंक होतो.जगातील अशाच कांही टॉप कॅसिनोची ही माहिती खास तुमच्यासाठी.

१)बेलाज्यों
1-The-Bellagio
वेगासच्या या कॅसिनोत येताना कांही नियम आहेत. ते म्हणजे तुम्ही जास्तीतजास्त दोन कुत्र्यांना बरोबर घेऊन येऊ शकता. तसेच येथील कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर तुम्हाला कितीही राग आला तरी तुम्ही ठोसा मारू शकत नाही. थोडे पैसे खर्चायची तयारी असेल तर कर्मचार्‍यांच्या पोटात गुद्दा मारू शकता मात्र चेहर्‍याला इजा करू शकत नाही. येथे खेळणार्‍यांना आकर्षित करण्यासाठी अनेक सुविधा दिल्या जातात. कॅसिनोत खेळणार्‍यांसाठी स्लॉट असतात. जादा पैसे भरण्याची तयारी असलेल्यांसाठी खास स्लॉट दिले जातात. तसेच खेळून दमला असाल तर पोटपूजेसाठी रेस्टॉरंटही आहे. येथील पदार्थ अतिशय चवदार आहेत असे फूड क्रिस्टीक्सही सांगतात. येथले शेफही अॅवॉर्ड विनर आहेत. मात्र पैसे हरलात तर त्याची वसुली करण्यासाठी खास रक्षकही आहेत.[nextpage title=”२)रिटझ क्लब”]

2-The-Ritz-Club
एखाद्या कलेचे वर्षानुवर्ष प्रशिक्षण घेऊन त्यात प्रावीण्य मिळविणे याला आर्टिझन असे म्हटले जाते. लंडनचा रिटझ क्लब हा असाच आर्टिसन म्हणता येईल. लंडनचा हा हॉटस्पॉट कॅसिनो संदर्भातला आर्टिझन आहे. येथे कुणालही ऐर्‍यांगैर्‍यांला मुळात प्रवेशच नाही. फक्त खासगी पाहुणेच येथे येतात. महालासारखा हा कॅसिनो क्लब चोवीस तास उघडा असतो आणि तरीही येथे शांत वातावरण असते. खेळ, पोटपूजा व एक्स्ट्रा एक्झक्लुझिव्ह सोशलायझेशन साठी भक्कम पैसे खर्च करणार्‍यांची येथे ये जा असते.[nextpage title=”३)कॅसिनो डी इबिझा”]

3-Casino-de-Ibiza
कॅसिनो म्हटले की बहुतेक ठिकाणी लहान मुलांना घेऊन प्रवेश निषिद्ध असतो. कदाचित जुगारात हरलेल्या आईबापांना ओक्साबोक्शी रडताना मुलांनी पाहू नये असा विचार त्यामागे असेल. मात्र स्पेनमधले इबिझा ग्रँन हॉटेल व कॅसिनो त्याला अपवाद आहे. येथे कुटुंबासह येण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. येथील स्टाफ आई वडील कॅसिनोत पैसे जिंकत असताना अथवा हरत असताना तुमची मुले सांभाळतात. मुख्य म्हणजे या हॉटेलचे प्राधान्य रिलॅक्स होण्यास आहे. त्यामुळे येथे स्पा, बॉडी रॅप, रिफ्लेक्सॉलॉजी, हॉट स्टीम, मसाज अशी साधने आहेत. येथली हवा नेहमीच आल्हाददायक असते. त्यामुळे बाहेर बीचवर जाऊन फाईव्हस्टार रेस्टॉरंटचा आस्वादही घेता येतो.[nextpage title=”४)पार्क हयात मेंडोसा”]

4-Park-Hyatt-Mendoza
स्पॅनिश वास्तूरचनेचा हा सर्वात लक्झूरियस बंगला म्हणजे जुनी शाळा आहे. येथला कानाकोपरा अगदी स्वच्छ राखला जातो आणि खोल्याही अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहेत. येथील कॅसिनो स्टाफ हा सर्वात महत्त्वाचा भाग. कारण हा स्टाफ अत्युकृष्ठ सेवा देण्यासाठी ओळखला जातो. कॅसिनोचे लोकेशन फारच छान आहेच पण येथील रेस्टॉरंटही मस्त मस्त पदार्थ पुरविण्यासाठी प्रसिद्ध आहे.[nextpage title=”५) द कास्मोपोलिटियन”]

5-The-Cosmopolitan
लास वेगास या अमेरिकेतील अर्थनगरीची सर्व संस्कृतीच मुळी पैशाभोवती फिरणारी आहे. कारण येथे नाईटक्लब्जची संख्याही मोठी आहे. द कास्मोपोलिटीयन हा कॅसिनो अमेरिकेतील सर्वात मोठा कॅसिनो आहे.येथे व्हीआयपी टेबल सर्व्हीस, कबाना सर्व्हीस दिली जातेच पण कांही सेवा मेन्यूत अॅड न करता येणार्‍या आहेत त्याही दिल्या जातात. ग्राहकांनी येथे पुन्हा पुन्हा आले पाहिजे अशीच ही मायानगरी आहे. १ लाख चौरस फूटात कॅसिनोचा पसारा असून येथे सतत गेमिंग सुरूच असते. ग्राहकांसाठी येथे नवे गेमिंग तंत्रज्ञानही उपलब्ध आहे त्यामुळे ते ब्लॅकपॅक, पोकर सारखे खेळ या ठिकाणी मोबाईलवरूनही खेळू शकतात.[nextpage title=”६)कॅसिनो डु लिबन”]

6-Casino-du-Liban
अमेरिकेतील राजकारण्यांना आपल्या खिशात ठेवण्यासाठी कॅसिनो मालक फारच हार्डवर्क करतात. लाच देणे, महागड्या कार, ज्वेलरी, पर्क्स अशी आमिषे नेहमीची झाली. मात्र एखादा राजकारणी त्याला भुलत नाही तर गॉडफादर सारख्या युक्त्याही हे कॅसिनो मालक करतात. परवाने मिळविणे ही त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी असते. लेबानन सरकार मात्र याला अपवाद आहे. कारण येथे कॅसिनो डू लिबन याचीच मोनॅपोली आहे.या कॅसिनोत फारच उत्तम प्रतीच्या सुविधा दिल्या जातात. शिवाय येथे सरकारी कर्मचारीही येऊ शकतात. आत प्रवेश करण्यासाठी एकच अट आहे. ती म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३३००० डॉलर्सपेक्षा कमी आहे , त्यांना येथे प्रवेश नाही. मग तो सरकारी अधिकारी असला तरीही.[nextpage title=”७)सेंट युजिन गोल्फ रिसॉर्ट कॅसिनो”]

7-St-Eugene-Golf-Resort-and
कॅनडातील हा रिसॉर्ट कॅसिनो फारच सुंदर लोकेशनवर आहे. या रिसॉर्टच्या खोल्यांमधून सेंट मेरी नदीचे विहंगम दृष्य दिसते आणि नदीचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी आरामदायी सूटसही आहेत. येथेच गोल्फ कोर्सही आहे. कॅसिनोतील खेळांचा उबग आला तर गोल्फ मैदानावर जाऊन रिफ्रेश होता येते अथवा नदीचे सौंदर्य न्याहाळताना हरलेल्या पैशांच्या दुःखाचा विसर पाडता येतो.[nextpage title=”८)माँटे कार्लो कॅसिनो”]

8-Monte-Carlo-Casino
फ्रान्समधील हा कॅसिनो फारच जुना आणि तरीही लक्झूरियस आहे.१८६३ मध्ये तो सुरू झाला. मोनॅको मोनार्ची ने लोकांच्या कष्टाने कमावलेल्या पैशांनाही कशी वाट फुटू शकते याची जाणीव लोकांना करून देण्यासाठीच जणू कॅसिनो संस्कृती आणली. गेली १५० वर्षे या एकाच ध्येयाने हा कॅसिनो चालतो आहे. ही जागाच आतिशय फॅन्सी आहे. बाँडच्या अनेक चित्रपटातूनही तिचे दर्शन घडले आहे. येथे येणार्‍या पाहुण्यांचे अगदी लाड केले जातात. बीचवर टेंट टाकून मेडिटेरियन समुद्राचे दर्शन घेता येते. येथे मॅन मेड लगून्सही आहेत.[nextpage title=”९)वान मकाऊ”]

9-Wynn-Macau
ज्यांच्याकडे उदंड पैसा आहे आणि तो कसाही उधळायची तयारी आहे, अशांनाही महाग वाटेल असा हा कॅसिनो कॉमिक बुक व्हिलन स्टीव्ह वानच्या मालकीचा आहे. या कॅसिनोत गुस्सी, कर्टियर, चॅनल, ह्यूगो अशी अतिमहागडी स्टोअर्स आहेत आणि एक आर्ट गॅलरीही. या गॅलरीत फक्त दुर्मिळ वस्तू मिळतात. ४०० वर्षांपूवीच्या मूर्ती, क्रिस्टलमध्ये कोरलेला ड्रँगन ही त्यातली काही उदाहरणे.[nextpage title=”१०) व्हेनेटियन मकाऊ”]

10-Venetian-Macao
या कॅसिनोची अशी ख्याती आहे की यात एकदा आत गेलेल्या माणसाला बाहेरचा रस्ताच सापडत नाही. हा कॅसिनो अतिआलिशान आहे आणि तितकाच महागडाही. येथे ५ लाख चौरस फुटांची गेमिंग प्लेस आहे तसेच लक्षावधी चौरस फूटांची जागा बिझिनेसमनना व्यवसायाची बोलणी करण्यासाठी राखली गेली आहे. येथला लहान स्यूट ३८०० चौरस फुटांचा आहे आणि तेथे सेवेसाठी खास बटलर आणि लिमोसीन गाडी पुरविली जाते. येथे एक दिवस राहण्याच्या खर्चात एक मोठे कुटुंब व्हेनिसची सहल सहज करू शकेल असे सांगितले जाते.

Leave a Comment