एलआयसी कर्मचार्‍यांना १५ टक्के पगारवाढ

lic
दिल्ली – भारतीय आयुर्विमा महामंडळातील कर्मचार्‍यांना १५ टक्के पगारवाढ मिळणार असून ऑल इंडिया एलआयसी एम्लॉईज फेडरेशनने त्याला मान्यता दिली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार युनियन आणि एलआयसीत हा करार नुकताच झाला असून तो मंजुरीसाठीअर्थ मंत्रालयाकडे पाठविला गेला आहे.

युनियनचे महासचिव ए.बी. नचाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०१२ पासून ही पगारवाढ दिली जाणार आहे. विशेष म्हणजे बँक कर्मचार्‍यांना मूळ वेतनात २ टक्कयांपेक्षा अधिक वाढ वर्षाला मिळणार नाही मात्र एलआयसीत मूळ वेतनात वाढीवर कोणतेही निर्बंध नाहीत. बँकांप्रमाणेच त्यांनाही दुसरा व चौथा शनिवार सुट्टी मिळणार आहे.

Leave a Comment