महिंद्राने लॉन्च ‘ऑटोमॅटिक ट्रान्समिशन’वाली ‘एक्सयूव्ही ५००’

mahindar
नवी दिल्ली : आपली एक नवी कोरी प्रीमियम स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल ‘एक्सयूव्ही ५००’ महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीने लॉन्च केली असून या गाडीचे ‘ऑटोमॅटिक ट्रान्समिशन’ हे वैशिष्ट्य ठरले आहे.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबरपासून महिंद्राच्या सर्वच डिलर्सकडे ऑटोमॅटिक एक्सयूव्ही ५०० ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध असेल. अगोदरच अनेक नवनवीन तंत्रज्ञान सर्वात अगोदर एक्सयूव्ही ५०० ने समोर आणले आहेत आणि एक्सयूव्ही ५०० ऑटोमॅटिकदेखील ग्राहकांना अनेक नवीन अनुभव देऊ शकेल. याआधी, कंपनीने एक्सयूव्ही ५०० ही गाडी २०११ मध्ये लॉन्च केली होती. हे नवीन व्हर्जन लॉन्च करण्याअगोदर आत्तापर्यंत जवळपास दीड लाख गाड्या विकल्या गेल्या आहेत. या गाडीची मुंबईतील शोरुममध्ये कमीत कमी किंमत आहे १५.३६ लाख रुपये.