प्रवासासाठी जगातील १० सुंदर रस्ते

[nextpage title=”प्रवासासाठी जगातील १० सुंदर रस्ते”]
collarge
प्रवास हा प्रत्येकाला कधी ना कधी करावा लागतो. पर्यटनासाठी जायचे असेल तर पर्यटनस्थळांइतकाच त्या स्थळी नेणारा रस्ता कसा आहे याची उत्सुकता वाटते. अनोख्या प्रदेशातील रस्ते आणखीच वेगळा अनुभव असतो. प्रत्येक रस्त्याला स्वतःचा असा चार्म असतो. कधी तो रस्ता सुंदर म्हणून लक्षात राहतो तर एखादा रस्ता भीतीदायक मार्गावरचा प्रवास म्हणून आपल्या आठवणी मनावर कोरतो. तसेच कांही रस्ते विस्मरणात जात नाहीत तर कुठल्याही प्रवासात त्यांची आठवण काढणे भाग पाडतात. कांहीही असले तरी प्रवास करणार्‍या तमाम मंडळींनी आयुष्यात एकदा तरी तुडवावेत असे जगातील दहा रस्ते आपल्या माहितीसाठी देत आहोत.

१) अटलांटिक ओशन रोड
1-Atlantic-Ocean-Road-in-No
नॉर्वेच्या कंट्री रोड ६४ चा हा छोटासा भाग असलेला रस्ता अविस्मरणीय या कॅटेगरीतला आहे. नॉर्वे समुद्रातून तो बेटाला जोडला जातो. शांत रम्य खेड्यातून जाणारा हा रस्ता अनेक बेटे पार करतो व ही सारी बेटे छोट्या छोट्या पुलांनी जोडली गेलेली आहेत. वाहन चालविणार्‍यांना हा रस्ता परमानंद देतोच पण अनेक कार उत्पादक आपल्या मालाच्या जाहिरातीत हा रस्ता दाखवितात. रस्त्यावरून घडणारे निसर्ग सौंदर्य बाजूला ठेवले तरी रस्ता जोडणारे पूलही अत्यंत सिनिक आहेत. नशीब जोरावर असेल तर या पुलांवरून जाताना समुद्रातील व्हेल्स आणि सील्सचे दर्शनही घडू शकते.[nextpage title=”२) हॅना हायवे-माऊ”]

2-Hana-Highway-in-Maui
हवाई बेटावरील हा रस्ता म्हणजे ब्युटीफुल ड्राईव्ह असे म्हणता येईल. अमेरिकेच्या प्रसिद्ध रेन फॉरेस्टमधून जाणारा हा रस्ता रौद्र सौंदर्याने मुसमुसलेला आहे. ५४ मैलांचा हा मार्ग अक्षरशः जीव मुठीत देऊन पार करावा लागतो कुडुलुई पासून हॅना टाऊनपर्यंतचे हे अंतर कापण्यासाठी किमान अडीच तास लागतात. हा रस्ता अरूंद वळणावळणाचा असून त्यावर तब्बल ५९ पूल आहेत. त्यातील सिंगल लेन वाले अधिक आहेत आणि त्यातील कांही १०० वर्षांचे जुनेही आहेत. या रस्त्यावर ६०० वळणेही आहेत.[nextpage title=”३)रोहतांग पास”]

3-Rohtang-Pass,-India
सतत कोसळणार्‍या दरडी आणि बेभरवशाचे हवामान असलेल्या या रस्त्यावर वाहतूक मात्र भरपूर आहे. रोहतांग पासची सहल ही जगातील कांही सुंदर सहलींपैकी एक आहे. हिमनद्या, उत्तुंग पर्वतशिखरे आणि खळाळत्या नद्यांचे दर्शन घडविणारा हा रस्ता मे ते नोव्हेंबर या काळातच सुरू असतो. कधीही येणारी हिमवादळे या रस्त्याला धोकादायक रस्ता म्हणून ओळख देतात.हा जुन्या व्यापारी मार्गांपैकी एक आहे. इतका अवघड आणि अडचणीचा असूनही या रस्त्यावर वाहतूक भरपूर असते. ती प्रामुख्याने पर्यटक आणि लष्करी गाड्यांची. रस्ता अवघड असला तरी अरूंद वळणे पार करताना प्रत्येक वळणावर होणारे निसर्गाचे नवे दर्शन हा प्रवासही अत्यंत आनंदाचा बनविते.[nextpage title=”४)कोल डी लेसेरान फ्रान्स”]

4-Col-de-l’Iseran,-France
आल्प्सच्या उंच रांगातून जाणारा फ्रान्सच्या सीमेवरचा हा रस्ता इटालीच्या रूट व द ग्रँड आल्प्सचा भाग आहे. हा रस्ता दोन प्रचंड खोल दर्‍यांना जोडतो. त्यात बोगदे, पूल आहेतच पण उत्तर भागात एक स्की रिसॉर्टही आहे. हा रस्ताही उन्हाळ्यातच सुरू असतो. हिवाळ्यात तो पिस्टरस स्क्री लिफ्टने जोडलेला असतो. या रस्त्यावरील धबधबे हे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. तसेच फ्रान्सच्या प्रसिद्ध टूर दि फ्रान्स चॅलेंजिग टूरमध्ये हा रस्ता स्पर्धकांसाठी आव्हानात्मक स्ट्रेच आहे.[nextpage title=”५)नॅशनल रूट ४० अर्जेंटिना”]

5-National-Route-40-(Ruta-4
अर्जेंटिनाच्या उत्तरसीमा व देशातील थंड दक्षिण पहाडी टोके जोडणारा ३ हजार मैल लांबीचा रस्ता विविध लँडस्केपचे दर्शन घडवितो. अँडीज पर्वत रांगांना समांतर जाणार्‍या या रस्त्याची देखभाल करणे हे आव्हानात्मक काम आहे. दक्षिणेकडे जेथे विरळ वस्ती आहे तेथे हा रस्ता फारसा चांगला नाही. मात्र वाहनचालकांसाठी तो धाडस दाखविण्याची संधी जरूर देतो. रूटा ४० हा जगातला लांब हायवे २० नॅशनल पार्कमधून जातो आणि डझनावारी नद्या, पर्वत ओलांडतो. हा रस्ता कांही ठिकाणी ५ हजार मीटर उंचीवरूनही जातो.[nextpage title=”६) यूएस वन- की लार्गो ते की वेस्ट, फ्लोरिडा”]

6-US-1-from-Key-Largo-to-Ke
नजर जाईल तिथपर्यंत निळाशार समुद्र दाखविणारा हा रस्ता यूएस वन मुख्य नॉर्थ साऊथ हायवेचा भाग आहे. हा रस्ता फ्लोरिडापर्यंत जातो. हा सारा प्रवासच मनाच्या कुपीत जपून ठेवावा असा देखणा आणि राजस आहे. बेटांच्या साखळीतून मार्ग काढणार्‍या या रस्त्यावर लांब लांब पूल आहेत तसाच तो गरम पाण्यावरून ही जातो. वाटेत प्रवाळांच्या रांगाही दिसतात. कांही वेळा तर आपण समुद्रावरूनच चालतोय असाही फील येथे येतो.विशेष म्हणजे डेस्टिनेशनपेक्षा हा रस्ताच आधिक सुंदर आहे.[nextpage title=”७) ट्राॅल स्टीजेन रोड, नॉर्वे”]

7-Trollstigen-Road,-Norway
या रस्त्याच्या नावाचा अर्थच मुळी ट्रोल लॅडर किवा खडा चढ असा आहे. वळणे वळणे घेत जाणारा हा रस्ता पहाडाच्या टोकावर पोहोचतो तेथे तुमच्या स्वागतासाठी एक सुंदर धबधबा आहे.नागमोडी वळणे घेणारा हा रस्ता शहरातून छोट्या खेड्याकडे नेतो. हे एक अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अत्यंत अरूंद असलेल्या या रस्त्यावर ११ हेअरपीन बेंड आहेत. खडा पहाड चढून जाणे हे वाहनचालकांसाठी एक आव्हानच आहे. हिवाळ्यात हा रस्ता बंद असतो आणि कार उभी करण्याची परवानगी फक्त पहाडाच्या टोकावरच आहे. बाकी वेळ तुम्हाला फक्त मार्गक्रमणा करत राहणे इतकेच करता येते.[nextpage title=”८)द कोबॉट ट्रेल-नोव्हा स्कॉटिया, कॅनडा”]

8-The-Cabot-Trail-in-Nova-S
कॅनडातील निसर्गसंपदेचे मनसोक्त रसपान करण्याची संधी देणारा हा रस्ता. मुळात कॅनडावर निसर्गाने दोन्ही हातानी संपत्ती उधळली आहे. येथील हायवेज सिस्टीमही अशी आहे की निसर्गाचे सौंदर्यपान करण्याची पुरेपूर संधी प्रवाशांना मिळेलच. कॅबॉट ट्रेल नोव्हा स्कॉटिया असाच अविस्मरणीय अनुभव देतो. पर्यटकांना आकर्षित करणे हे या रस्ता बांधकामाचे मुख्य उदिष्ट असावे अशी शंका घेण्यास येथे पुरेपुर वाव आहे. केप ब्रेटन हायलंड भागात स्कॉटीश फिल येतो आणि येथील परंपरा, वारसा यांची ओळख आपोआपच होत जाते. केप ब्रेटन हायलंड नॅशनल पार्कचा कांही भाग या रस्त्यात येतो तर कांही भाग समुद्रकिनार्‍यावरून जातो.[nextpage title=”९) मिलफोर्ड रोड”]

9-The-Milford-Road
(स्टेट हायवे ९४) न्यूझीलंडमधील प्रसिद्ध पर्वत, नद्या यांचे दर्शन घडविणारा हा रस्ता जगातील सर्वात सौंदर्यशाली, सर्वाधिक उंचीवरून जाणारा आणि धोकादायक अशा सर्वच विशेषणांना शोभून दिसतो. या मार्गावरून जाताना होमर टनेल ओलांडावा लागतो व टाऊनशीपमधून जाताना तो दक्षिण आल्पस ओलांडतो.[nextpage title=”१०) ब्ल्यू रिज पार्कवे अॅपालाचिया,अॅपाल्ची”]

10-The-Blue-Ridge-Parkway
अमेरिकेतला पार्कवे हा ४६९ मैलांचा रस्ता सर्वात सुंदर आणि देखणा म्हणून प्रसिद्ध आहे. व्हर्जिनिया ते नॉर्थ कॅरोलिना असा प्रवास असलेला हा रस्ता ब्ल्यू रिजवरून जाताना अल्पासियन पर्वत रांगांचे मनोहारी दर्शन घडवितो. पहाडांचे रौद्र सौंदर्य, सुंदर नद्या, खाड्या, चुनखडीच्या गुहा असे विविध संपदेचे दर्शन यावर घडतेच पण त्यातील ग्रेट स्मोकी पहाड सगळ्यात वरचढ. नॅशनल पार्क उत्तर कॅ रोलिनातून जाणारा हा रस्ता नॅशनल पार्कचा भाग नाही तरीही तो सर्वाधिक प्रमाणात भेट दिला जाणारा रस्ता आहे. म्हणजे हा रस्ता पाहण्यासाठी म्हणून येणार्‍यांची संख्याही प्रचंड मोठी आहे.

Leave a Comment