डिस्ने कर्मचार्‍यासाठीच्या १० विचित्र अटी

[nextpage title=”डिस्ने कर्मचार्‍यासाठीच्या १० विचित्र अटी”]
collarge
डिस्ने वर्ल्ड, डिस्ने पार्क आणि थीम पार्कने जगात मिळविलेली अभूतपूर्व लोकप्रियता पाहून येथे काम करणे किती मनोजंरक, आनंददायी असेल असे वाटत असेल तर ही माहिती वाचून पहा. कोणतीही नोकरी असली तरी त्यासंदर्भात प्रत्येक कंपनीचे कांही कायदे कानून आणि नियम असणारच. कर्मचार्‍यांनी ते पाळावे अशी अपेक्षाही चुकीची नाही. मात्र डिन्से कंपनीचे कर्मचारी म्हणून काम करताना कांही गुप्त नियम तेथील कर्मचार्‍यांना पाळावे लागतात. १९५५ ला पहिले डिस्ने पार्क सुरू झाले आणि आजही जगभरातल्या अनेक डिस्ने पार्कमधून अद्भूत वातावरणात काम करण्याचा अनुभव तेथील कर्मचारी घेत आहेतच. पण ही नोकरी वाटते तितकी सोपी आणि सहज नाही. डिस्नेने कर्मचार्‍यांसाठी तयार केलेले कांही गुप्त नियम त्या कर्मचार्‍यांना सदासर्वकाळ पाळावे लागतात. कोणते आहेत हे नियम?

१)नखाची लांबी
1-Fingernail-Length
स्वच्छ, चांगल्या कपड्यांमध्ये अथवा गणवेशांमध्ये कर्मचार्‍यांनी कामावर यावे ही अपेक्षा मुळीच गैर नाही. मात्र त्यापुढे जाऊन डिस्नेने कर्मचार्‍यांच्या नखाची लांबी किती असली पाहिजे याचाही नियम केला आहे. येथील पुरूष कर्मचार्‍यांनी बोटाच्या टोकांबरोबरच नखे कापणे बंधनकारक आहे तर महिला कर्मचारी मात्र बोटांच्या टोकांपेक्षा थोडी बाहेर येतील या प्रकारे नखे कापू शकतात.[nextpage title=”२) उंची-“]

2-height
संरक्षणदलांसारखे कांही विभाग सोडले तर नोकरीवर घेताना माणसाची उंची अमूक इतकीच असली पाहिजे असा नियम आधुनिक समाजात मान्य होणार नाही. केवळ उंची कमी किंवा जास्त म्हणून एखाद्याची योग्यता कमी ठरविणे हे गैर आहेच. मात्र डिस्ने लँडमध्ये त्यांच्या कॅरेक्टर प्रिन्सेसच्या भूमिका करणार्‍या कलाकारांना ५.४ ते ५.८ इतक्या दरम्यान उंची असेल तरच निवडले जाते.[nextpage title=”३) आय डोंट नो ला बंदी”]

3-i-dont-know
कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी गेलेले प्रेक्षक तेथील कर्मचारी, गाईड यांना अनेक प्रश्न विचारतात. प्रेक्षणीय स्थळांवरचे हे गाईड बहुतेक प्रश्नांची उत्तरे देतात मात्र कांही प्रश्न असे विचारले जातात की त्याचे उत्तर संबंधित गाईडला माहिती नसते. अशा वेळी तो आय डोंट नो असे सांगतो. पण डिस्ने लँडमधील कर्मचार्‍यांना असे आय डोंट नो उत्तर देण्यास बंदी आहे. एखाद्यावेळी एखाद्या प्रश्नाचे उत्तर त्याला खरोखरच माहिती नसेल तर अशावेळी त्याने मला माहित नाही असे न सांगता ऑपरेटरला फोन करून माहिती घ्यायची आणि प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असाही येथे नियम आहे.[nextpage title=”४) कॅरेक्टर ब्रेक करता येत नाही”]

4-They-Can’t-Break-Characte
डिस्नेची सर्वच कॅरेक्टर म्हणजे मिकी माऊस, डोनाल्ड डक, गुफी वगैरे स्वतःची खास ओळख असलेली आहेत. जे कर्मचारी या कॅरेक्टरच्या भूमिका साकारतात त्यानी तसाच पोशाख आणि तशीच वर्तणूक ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजे डिस्नेबाहेरच्या जगाची चर्चा करण्याची अथवा चालू घडामोडींवर चर्चा करण्याची, कांही बोलण्याची त्यांना परवानगी नाही. अगदी कुणी ऑटोग्राफ मागितला तरीही तो त्या कॅरेक्टरच्या सहीनुसारच द्यावा लागतो.[nextpage title=”५)हेअरस्टाईल”]

5-hair-style
डिस्नेने निर्माण केलेली कॅरेक्टर ही जगभरात लोकप्रिय आणि स्वतःची प्रतिमा असलेली आहेत. त्यामुळे या कॅरेक्टर साकारणार्‍याना पोशाख, हेअरस्टाईल काटेखोरपणे सांभांळावी लागते कारण शेवटी तो डिस्नेच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. ऐकायला कदाचित विचित्र वाटेल पण हेअरस्टाईल संबंधी कांही स्टँडर्ड कंपनीने तयार केली आहेत. त्यानुसार मेल कॅरेक्टरना केस नीट कापलेले आणि मऊ दिसतील असे ठेवावे लागतात. कानावर येणारे अथवा कॉलरवर येणारे केस चालत नाहीत. महिलांना मात्र सहज मेटनेन करता येतील आणि क्लासिक हेअरस्टाईल करता येईल अशा प्रकारे केस कापावे लागतात.[nextpage title=”६) कचरा उचला स्टाईलमध्ये”]

6-Pick-Up-Trash
डिस्ने लँडच्या कोणत्याही उद्यानात अथवा पार्क मध्ये गेलात तर सारा परिसर एकदम चकाचक स्वच्छ दिसेल. तुम्हाला जर असे वाटत असेल की त्यासाठी शेकड्यांनी कचरा उचलणारे कर्मचारी नेमले गेले आहेत तर तुम्ही पूर्णपणे चुकताय. डिस्ने पार्कमध्ये कचरा उचलण्यासाठी वेगळे कर्मचारी नाहीत. येथे काम करणारे कर्मचारीच हे काम करतात. मात्र ते जर ठराविक कॅरेक्टरच्या ड्रेसमध्ये असतील आणि जमिनीवर कांही कचरा दिसला तर सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनी तो वाकून थेट उचलायचा नाही तर कॅरेक्टरला शोभेल याप्रकारेच ग्रेसफुल हालचाल करून तो उचलायचा असा नियम आहे.[nextpage title=”७)बॉडी मॉडिफिकेशन नाही”]

7-No-Body-Modifications
डिन्सेच्या कॅरेक्टर साकारणार्‍या कर्मचार्‍यांना अंगावर गोंदून घेणे, टोचून घेणे, इयरिंग्ज घालणे, स्कीन इंप्लांट करणे यासारखे बदल शरीरात करून घेता येत नाहीत. कारण जगभरात डिस्ने कॅरेक्टरची जी प्रतिमा आहे त्यात या गोष्टी नाहीत. नाही म्हणायला हे कलाकार टॅट्यू काढून घेऊ शकतात मात्र तो दिसता कामा नये अशी अट आहे.[nextpage title=”८)वर्तणूक चांगलीच हवी”]

8-Constant-Good-Behavior
सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जेथे प्रेक्षक अधिक प्रमाणात भेटी देतात त्या स्थळावरील कर्मचार्‍यांची वर्तणूक चांगलीच असली पाहिजे यात कांही वाद नाही. मात्र डिस्ने याबाबत जरा अधिक कडक आहे. येथील कॅरेक्टर साकारणारे कर्मचारी जेव्हा त्या व्यक्तीरेखेच्या पोशाखात असतील तेव्हा ते मोबाईल वापरू शकत नाहीत. काम करताना खाऊ शकत नाहीत. उभे राहतानाही योग्य प्रकारेच त्यांना उभे राहावे लागते आणि ते कुठेही भटकू शकत नाहीत.[nextpage title=”९) कॅरेक्टरबद्दल चर्चेला बंदी”]

9-You-Can’t-Talk-About-Your
डिस्ने कॅरेक्टर निभावणे वाटते तितके सोपे नाही. अल्लादिन, सिंड्रेला, स्नोव्हाईट, गूफी ही कॅरेक्टर करणार्‍या कर्मचार्‍यांना आपल्या भूमिकेविषयी बाहेर कुणालाही अगदी जिवलग मित्राला किंवा घरच्या लोकांनाही सांगता येत नाही. सोशल मिडीया साईटवर त्याची चर्चा करता येत नाही. यामागे संबंधित पात्राबद्दलचे गूढ आणि आकर्षण कमी होऊ नये अशी कंपनीची भूमिका आहे.[nextpage title=”१०) अंगुली निर्देश निषिद्ध”]

10-No-Pointing
समजा आपल्याला कुणीही एखादा पत्ता विचारला तर आपण संबंधित पत्त्याच्या दिशेने बोट दाखवून त्याला माहिती देतो. डिस्नेमध्ये मात्र असा अंगुली निर्देश करणे निषिद्ध आहे. स्टाफ मेंबरला समजा एखाद्या व्हिजिटरला त्याने विचारलेल्या ठिकाणी कसे जायचे याची दिशा दाखवायची वेळ आलीच तर त्याने हाताचा पूर्ण पंजा उघडून दोन बोटे त्या दिशेला दाखवायची. संपूर्ण हात उघडा असेल तर मुलांना दिशा लवकर कळते हे एक कारण आणि दुसरे म्हणजे जगाच्या अ्रनेक देशात एक बोट उगारणे हे अवमानकारक समजले जाते. डिस्ने पार्कमध्ये देशविदेशातून सतत लोक येत असतात. त्यापैकी कुणाचाही या कृतीने अवमान होऊ नये यासाठी येथे एक बोट उगारणे निषिद्ध ठरविले गेले आहे.

Leave a Comment