आमिरच्या वक्तव्याचा स्नॅपडीलला फटका

aamir-khan
नवी दिल्ली- देशातील असहिष्णुतेबद्दलच्या आमिर खानच्या विधानामुळे राजकारणासोबतच बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असून यामुळे आमिरवर चौफेर टीका होत आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट स्नॅपडीलला या सगळ्या प्रकाराचा परिणाम मोठा फटका बसण्याची शक्यता असून स्नॅपडीलचा आमिर खान हा अॅम्बेसडर आहे. स्नॅपडील अनइस्टाल करून यूजर्स आमिर खानविरोधात आपला संताप व्यक्त करत आहेत.

सोमवारी एका कार्यक्रमात आमिर खानने देशातील असहिष्णुतेबद्दलचे वक्तव्य केले होते. ‘आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, हे मी एक व्यक्ती, एक नागरिक आणि या देशाचा एक भाग म्हणून आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, टीव्हीवर पाहतो. त्यामुळे निश्चितपणे मी धास्तावलेलो आहे. त्याचा इन्कार करू शकत नाही. अनेक घटनांनी मला चिंतेत टाकले. मुलांच्या सुरक्षेबाबतच्या भीतीमुळे एकदा तर पत्नीने (किरण राव) भारतच सोडून जाऊ, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे आमिरने म्हटले होते. आमिरच्या वक्तव्यावरुन देशात चौफेर रान पेटले आहे. सोशल मीडियावर तर आमिरच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात येत आहे.

Leave a Comment