मुंबई : रेड मी नोट ३ सोबतच एमआयपॅड २ हा टॅबलेट शाओमीने लाँच केला असून आधीचा एमआय पॅड १ च्या तुलनेत नवीन एमआय पॅड २ हा तब्बल १८ टक्के कमी जाडीचा तर वजनालाही ३८ ग्रॅम कमी आहे.
शाओमीने लाँच केला अँड्रॉईड आणि विंडोज असलेला एमआयपॅड २
टॅब डार्क ग्रे आणि शॅम्पेन गोल्ड रंगात शाओमीचा हा एमआय पॅड २ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या टॅबचा प्रोसेसर इंटेल अॅटम एक्स५ -झेड८५००चा आहे. तर ७.९ इंचाचा आणि २०४८×१५३६ रिझोल्यूशनचा डिस्प्ले तसेच ३२६ पिक्सेल पर इन्डेक्सचा आहे.
शाओमीच्या एमआय पॅडचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे या टॅबमध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीची ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. हा टॅबलेट विंडोज १० किंवा अँड्रॉईड अशा दोन्ही ओएसवर तुम्हाला वापरता येईल. या नव्या टॅबचा फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल तर मुख्य म्हणजे रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे.
शाओमीने लाँच केलेला टॅबही १६ जीबी आणि ६४ जीबी अशा दोन प्रकारात उपलब्ध करुन दिला आहे. १६ जीबी मेमरी स्टोरेजच्या टॅबची किंमत भारतीय चलनात १०५०० रुपये इतकी आहे.