ताल्लिन (एस्टोनिया) – लाय-फाय हे तंत्रज्ञान आता ‘वाय फाय’ची जागा घेणार असून, याचा वेग वाय-वायपेक्षा १०० पट अधिक असून या माध्यमातून १ जीबी डाटा ट्रान्समीट करण्यासाठी अवघा एक सेकंद वेळ लागतो. प्रायोगिक तत्वावर लाय-फायची गती दिसून आली असून, त्याचा हेतू साध्य झाला आहे.
‘लाय-फाय’ करणार एका सेकंदात फिल्म डाउनलोड
वाय-फायहून शंभरपट अधिक वेगवान असणारे लाय-फाय लवकरच नेटिझन्ससाठी येणार आहे. लाय-फायची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. ‘लाय-फाय’द्वारे कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये एक जीबी डेटा ट्रान्स्मिट करणं शक्य होणार आहे. म्हणजे एक सिनेमा अवघ्या एका सेकंदात डाऊनलोड करता येणार आहे. २०११ मध्ये स्कॉटलँडमधील एडिनबर्ग यूनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी लाय-फायचे संशोधन केले आहे.
लाय-फाय काय आहे?
लाय-फाय तंत्रज्ञानात लेड बल्बच्या माध्यमातून इंटरनेट अॅक्सेस
एलईडी बस्बमध्ये एक मायक्रोचिप लावली गेली आहे.
वाय-फायच्या तुलनेत अधिक सुरक्षित
हे तंत्रज्ञान वीज बिल लाईट कम्युनिकेशनवर (VLC) आधारित आहे.
बायनरी कोडमध्ये ट्रान्समिट होणारं हे तंत्रज्ञान आहे.