जगातील सर्वात महागड्या वस्तू

[nextpage title=”जगातील सर्वात महागड्या वस्तू”]
collarge
जगभरात सर्वसामान्य लोकांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सतत कांही ना कांही खरेदी केली जात असते. त्यात गरजेच्या वस्तूंपासून चैनीच्या वस्तूंचा समावेश असतो तसेच कांही वस्तू शौक म्हणूनही खरेदी केल्या जातात. अशा वस्तूंसाठी कुणी किती किंमत मोजावी हे ज्याच्या त्याच्या मगदूरावर अवलंबून असते. कांही वस्तू दुर्मिळ म्हणून अधिक महाग असतात तर कांही वस्तू पॅशन, आकर्षण म्हणूनही खरेदी केल्या जातात. जगात आजपर्यंत महागड्या ठरलेल्या कांही वस्तूंची ही माहिती.

१)लेस फेम्स डी एल्गर
1-Most-Expensive-Painting
हे पाब्लो पिकासो याचे पेटींग ११ मे २०१५ ला लिलावात १७३.९ दशलक्ष डॉलर्सला विकले गेले.( १ अब्ज १८ कोटी ४८ लाख रूपये) ख्रिस्टी या जगप्रसिद्ध ऑक्शन हाऊसने त्याचा लिलाव केला. ग्राहकाचे नांव जाहीर केले गेले नसले तरी शेख हमद बिन जसीम बिन जाबर अलथानी या कतार देशाच्या माजी पंतप्रधानांनी ते खरेदी केले असावे असा तर्क आहे. विशेष म्हणजे पिकासोचे हे पेंटींग फारसे खास नाही असे तज्ञ सांगतात. कांहीही असले तरी ज्याने ते खरेदी केले आहे ते तो उघडपणे कधीच लावू शकणार नाही कारण हे पेंटींग त्याने इतक्या प्रचंड किमतीला खरेदी केले आहे यावर कुणीच म्हणजे अगदी त्याच्या जवळच्या व्यक्तीही विश्वास ठेवू शकणार नाहीत.[nextpage title=”२) महागडे खासगी जेट”]

2-Most-Expensive-Private-Je
प्रिन्स ऑफ सौदी अरेबिया अल वालीद बिन तलाल याच्या मालकीचे एअरबस ए ३८० हे विमान जगातील सर्वाधिक महागडे खासगी जेट मानले जाते. वास्तविक या विमानाची किंमत ३०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत आहे मात्र प्रिन्सने त्यावर आणखी २०० दशलक्ष डॉलर्स खर्च करून त्याची सजावट केली आहे. परिणामी विमानाची किंमत ५०० दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. या जेटमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सार्‍या सुविधा आहेत. दुमजली जेटमध्ये सलून, आफिसेस, खासगी स्यूटस आहेत. मात्र प्रिन्सच्या मनाचे अजूनही समाधान झालेले नाही आणि यापेक्षाही महागडे जेट घेण्याची त्याची इच्छा आहे.[nextpage title=”३)मौल्यवान सुशी”]

3-Most-Expensive-Sushi
जपानचा हा लोकप्रिय खाद्यप्रकार. तो महाग असून असून किती असणार असा जर तुमचा समज असेल तर मग हे वाचाच. २०१० साली एका फिलीपिनो शेफने तयार केलेले सुशीचे पाच पीस अँजेलिनो अरनेटश ज्युनिअर याने १९७८.१५ डॉलर्सला खरेदी केले. ही सुशी तयार करताना कच्च्या माशांच्या पातळ कापांवर भाताचे गोळे ही नेहमीची कृतीच होती. पण ती गार्निश करण्यासाठी किमती हिरे, मोती व अस्सल २४ कॅरेटचे सोन्याचे पान लावले गेले होते. ही सुशी खाण्यासही योग्य होती. फक्त ती हिरे, सोने आणि मोती काढून मगच खावी लागली.[nextpage title=”४)फरारी २५० जीटीओ रेसर”]

6-Most-Expensive-Car
पॉल पापालार्डो याच्याकडे मालकी असलेली फेरारीची ही रेसर २०१३ साली लिलावात विक्रीला आली तेव्हा ती ५२ दशलक्ष डॉलर्सला विकली गेली. पापालार्डो हा कनेक्टिकटचा राहणारा संग्राहक होता. १९६४ साली त्याने ही कार विकत घेतली होती. लिलावात विकली गेलेली ही आत्तापर्यंतच सर्वात महागडी सेलिब्रिटी कार आहे. ती कुणी खरेदी केली त्याचे नांव जाहीर केले गेलेले नाही मात्र ही कार ऑटोमोटिव्ह आर्टिस्ट्रीचा मास्टरपीस आहे यात शंका नाही. यापूर्वी जे झेड ही कार ८ दशलक्ष डॉलर्सना विकली गेली होती. तिचे रेकॉर्ड या गाडीने मोडले आहे.[nextpage title=” ५)खर्चिक चुंबन”]

4-Most-Expensive-Kiss-at-an
ऐकायला जरा विचित्र वाटेल पण हे सत्य आहे. २००३ मध्ये जॉनी रिम याने अमेरिकन अभिनेत्री शेरॉन स्टोन हिला दिलेले चुंबन हे सर्वाधिक एक्स्पेन्सिव्ह मानले जाते कारण ते एका सार्वजनिक कार्यक्रमात आणि हजारो लोकांसमोर दिले गेले होते. हें दोघेही एडस ग्रस्तांच्या एका चॅरिटी शोसाठी आले होते. हे चुंबन तब्बल १ मिनिट घेतले गेले. त्याचा नंतर लिलाव झाला. अँजल फूडस या चॅरिटी संस्थेचा हा कार्यक्रम होता. ही संस्था एडसग्रस्ताना अन्न पुरविण्याचे काम करते.[nextpage title=”६)महागडा पदार्थ”]

5-Most-Expensive-Substance
सोने, प्लॅटीनम, हिरे हे महागडे म्हणून आपल्याला परिचित आहेत. मात्र पृथ्वीवरचा अँटीमीटर हा सर्वाधिक महागडा पदार्थ आहे. त्याच्या एका ग्रॅमची किंमत आहे १०० ट्रीलीयन डॉलर्स. हा फारच दुर्मिळ असून वातावरणाच्या कडांवर सापडतो. पार्टिकल अॅक्सिलरेटर मध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे १ किलो अँटीमीटर व त्याच वजनाचा दुसरा पदार्थ एकमेकांवर धडकले तर थर्मोन्युक्लीअर बॉम्ब फोडल्यावर जितकी उर्जा निर्माण होते तेवढीच उर्जा या धडकेतून मिळते. थर्मोन्यूक्लिअर हा सर्वात मोठा बॉम्ब आहे.[nextpage title=”७) ज्वेलरी”]

7-Most-Expensive-Piece-of-J
ज्वेलरी म्हटले की हिर्‍या मोत्याचे माणकांचे दागिने आपल्या नजरेसमोर तरळतात. पूर्वीचे राजे, रजवाडे, नबाब, महाराज यांच्याकडे तर रत्नांची भांडारे होती. मात्र आजपर्यंत विक्रीला आलेल्या दागिन्यात सर्वाधिक मौल्यवान ठरली आहे ती पिंक हिर्‍याची अंगठी. ओव्हल शेपचा ५९.६० कॅरटचा हिरा असलेली ही अंगठी लिलावात ८० दशलक्ष डॉलर्सना विकली गेली. सूथबे लिलाव कंपनीने हा लिलाव केला होता. ग्राहकाचे नांव जाहीर केले गेले नव्हते. मात्र ग्राहक लिलावाची ही रक्कम मुदतीत भरू शकला नाही त्यामुळे ही अंगठी सूथबे कंपनीकडे परत आली. २०१३ साली हा लिलाव केला गेला होता.[nextpage title=”८)महागडी शस्त्रक्रिया”]

8-Most-Expensive-Surgery
कोणतीही शस्त्रक्रिया करायची तरी मोठ्या रकमेची जुळवाजुळव करावी लागतेच. मात्र आजपर्यंत केल्या गेलेल्या शस्त्रक्रियात सर्वात महागडी म्हणून अमेरिकेत केली गेलेली ओपन हार्ट व्हॉल्व सर्जरी नोंदली गेली आहे. या शस्त्रक्रियेसाठी रूग्णाला ५३४०० डॉलर्स भरावे लागले. त्याच्या हृदयाचा खराब झालेल्या व्हॉल्व बदलण्यासाठी बरगड्या कापून हृदय ओपन करावे लागले होते.[nextpage title=”९) महागडा घोडा”]

9-Most-Expensive-Horse
हॉर्स रेसिंग हा आता केवळ खेळ किवा शौक राहिलेला नाही तर तो भलाथोरला उद्योगच झाला आहे. उद्योगाचा दर्जा असल्याने रेसचा महत्त्वाचा घटक असलेले घोडे यांची चर्चा, खरेदी आणि विक्री आलीच. आत्तापर्यंत रेसच्या घोड्यांसाठी कोट्यावधी रूपये मोजणारे स्टडफार्म मालक ऐकून माहिती असतील. आपल्या पुण्याच्या सायरस पूनावाला यांनीही एका घोड्यासाठी ७ कोटी रूपये मोजले आहेत. मात्र आत्तापर्यंत सर्वात महागडा घोडा ठरला आहे तो ग्रीन मंकी. हा घोडा अतिवेगवान म्हणून प्रसिद्ध होता आणि त्याच्याविषयी अनेक अफवाही पसरल्या होत्या. फ्लोरिडातील कॅडलर रेस कोर्सवर झालेल्या या घोड्यांच्या लिलावात त्याला तब्बल १६ दशलक्ष डॉलर्स इतकी किंमत मिळाली होती. हा लिलाव २००६ साली झाला होता.[nextpage title=”१०) वेपन”]

10-Most-Expensive-Weapon-Sy
वेपन म्हणजे शस्त्रे. लढाईसाठी वापरली जाणारी लढावू विमानेही वेपन सिस्टीम म्हणूनच ओळखली जातात. जगातील आत्तापर्यंतचे सर्वात महागडे लढावू विमान अमेरिकेत बनते आहे. लॉकहीड मार्टिन एफ ३५ असे त्याचे नाव असून त्याच्या निर्मितीसाठी ४०० अब्ज डॉलर्स खर्च आला आहे. अर्थात या विमानांच्या एका ताफ्याची किमत १ ट्रिलीयन डॉलर्स इतकी होणार आहे. पेंटागॉनमधील अधिकारी सांगतात वास्तविक हे विमान २०१० मध्येच हवाई दलात समाविष्ट केले जाणार होते मात्र आता ते २०१७ मध्ये येईल. स्टील्ट फायटर जातीचे हे विमान रडारवर दिसत नाही.

Leave a Comment