लेनोव्होने आणला ३ कॅमेरेवाला ‘वाईब एस १’

lenova
मुंबई : भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लेनोव्हो इंडियाने लॉन्च केला असून या फोनचे नाव लेनोव्हो वाईब एस १ असे आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये बर्लिनच्या टेक शोमध्ये या स्मार्टफोनचा पहिला लूक दाखवण्यात आला होता.

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरे असून सेल्फी काढण्याची आवड असणाऱ्यांसाठी लेनोव्होने फ्रंटला दोन कॅमेरे आणि तेही वेगवेगळ्या रिझॉल्युशनचे दिले आहेत. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर कव्हर्ड ग्लासचा वापर केला आहे.

५ इंचाचा एचडी डिस्प्ले ‘लेनोव्हो वाईब एस १’ला देण्यात आला असून ७.८ एमएम एवढा आकार असलेला हा स्मार्टफन १३२ ग्रॅम वजनाचा आहे. हा अँड्रॉईड स्मार्टफोन ५.० लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा आहे.

यासोबत ६४-बिट १.७गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि ३२जीबी इंटरनेट स्टोरेजही देण्यात आले आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने या स्मार्टफोनची मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो. या स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेरे असणार आहेत. ८ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल असे दोन फ्रंट कॅमेरे आणि १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 4 जी, 3 जी, जीपीआरएस/एज, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी आणि ब्लूटूथचीही सुविधा आहे. पर्ल व्हाईट आणि मिडनाईट ब्लू रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये एवढी असणार आहे. हा स्मार्टफोन एक्स्लुझिव्हली अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment