या डेर्‍याच्या जमिनीची मालकी कुत्र्यांकडे

dogs
पंजाब राज्यातील पटियाला पासून २० किमी अंतरावर असलेल्या एका डेर्‍याची ( मंदिराची ) मालकी गेली २०० वर्षे कुत्र्यांकडे आहे हे कदाचित खरे वाटणार नाही. पण पटियालाच्या तत्कालीन महाराजांनीच या मंदिराची जमीन कुत्र्यांना दान दिली होती. त्यामुळे आजही येथील प्रमुख पुजारी सकाळीसकाळी मंदिराबाहेर येऊन कुत्र्यांसारखे आवाज जोरजोरात काढतात. आवाज ऐकताच आसपासची कुत्री गोळा होतात. मग त्या कुत्र्यांना खायला घातले जाते. कुत्र्यांना खायला घातल्या शिवाय पुजारी स्वःत खात नाहीत. ही प्रथा गेली २० वर्षे सुरू आहे. कुत्र्यांना बोलावून खायला घालण्याच्या या प्रथेला रूक्का असे म्हटले जाते. या मंदिरातील भितींवर असलेल्या अनेक चित्रांत देवदेवतांसोबत कुत्रीही चितारली गेली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हा डेरा जेथे आहे, तेथे पूर्वी जंगल होते. तेथे एक साधू आला. जंगलातील या डेर्‍यातच त्याने वास्तव्य केले. तो दिवसातून तीन वेळा कुत्र्यांसारखा आवाज काढून कुत्र्यांना बोलवीत असे आणि त्यांना खायला घालत असे. या साधूच्या भेटीला पटियालाचे महाराज आले व त्यांनी साधूला कांही जमीन दान देण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा साधूने ही जमीन घेण्यास नकार दिला व ती कुत्र्यांच्या नावाने द्यावी असे महाराजांना सांगितले. त्यानुसार ही जमीन कुत्र्यांना दिली गेली. तेथपासून ही जमीन कुत्र्यांच्या मालकीची समजली जाते.महसूल विभातही या जमीनीची तशीच नोंद आहे.

Leave a Comment