मोरोक्कोमध्ये सौरउर्जा झळकावणार संपूर्ण शहर

solar
मोरोक्को: उर्जा निर्माण करताना होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न संपूर्ण जगाला भेडसावत असताना आफ्रिकेतील मोरोक्कोसारख्या देशाने एक संपूर्ण शहर सौरउर्जेने झळकावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर स २०२० पर्यंत देशाची उर्जेची ४२ टक्के गरज सौरऊर्जेद्वारे भागविण्याचा मोरोक्कोचा निर्धार आहे.

वरजाजात या शहरात एक प्रचंड मोठा सौरउर्जा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामध्ये सूर्याच्या प्रकाशाचा वापर करून मीठ वितळवले जाणार आहे. या वितळलेल्या मीठाद्वारे रात्री मोठे टर्बाईन चालवून त्याद्वारे वीजनिर्मिती करण्यात येईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात मोठ्या सौरउर्जा प्रकल्पांपैकी एक असणार आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर प्राथमिक टप्प्यात वरजाजात शहराला ३ तास वीज पुरवली जाईल. त्यानंतर सलग २० तास वीज पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

इंग्लंडसारख्या प्रगत राष्ट्रानेदेखील सन २०२० पर्यंत ३० टक्के वीज सौरऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचा संकल्प केला असताना मोरोक्कोने हे उद्दिष्ट ४२ टक्के एवढे ठेवल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने कौतुक केले आहे.

Leave a Comment