आता डासच करणार ‘मलेरिया’चा प्रतिबंध

malaria
न्यूयॉर्क: अमेरिकन शास्त्रज्ञांनी डासांच्या जनुकात बदल करून मलेरियाचा फैलाव करणाऱ्या डासांनाच मलेरियाचा प्रतिबंध करणाऱ्या डासांमध्ये रुपांतरीत करण्यात यश मिळविले आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी डासांच्या जनुक परिवर्तन तंत्राचा वापर करून डासांच्या जनुकात बदल करून त्यांना मलेरियाच्या विषाणूंचा फैलाव करण्यापासून रोखले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळाप्रमाणेच राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अहवालात या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जनुक परिवर्तन तंत्रज्ञानाने मलेरियाचा प्रतिबंध करण्यास निश्चित यश येईल; असा विश्वास विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक अँथोनी जेम्स यांनी व्यक्त केला आहे. हे यश प्राथमिक स्वरूपाचे असले तरीही या प्रयोगाच्या यशामुळे त्याची वाढविल्यास मलेरियासारख्या जीवघेण्या रोगाशी लढण्याचा आत्मविश्वास शास्त्रज्ञांमध्ये निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

‘अॅनोफिलीस स्टेफेन्सी’ या प्रजातीच्या डासांच्या मादीमुळे मलेरियाचा फैलाव होतो. मलेरियाचा प्रतिबंध करे आणि तो बरा करणे शक्य असले तरीही अजूनही जगात मलेरियामुळे मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या उल्लेखनीय आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सन २०१५ मध्ये मलेरियाने ४ लाख ३८ हजार जणांचा बळी घेतला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment