नवी दिल्ली : दिवसेंदिवस ऑनलाईन खरेदीची संख्या वाढत असून यामध्ये, रिटेल व्यापाऱ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. आता एक नवीन ई-कॉमर्स वेबसाईट फक्त याच छोट्या रिटेल व्यापाऱ्यांसाठी सुरू झाली आहे. ई-कॉमर्स, छोटे व्यापारी आणि ग्राहक यांच्यात मेळ ई-लाला (www.elala.in) ही वेबसाईट घडवून आणणार आहे.
फ्लिपकार्ट, अॅमेझॉनला टक्कर देणार ‘ई-लाला’!
याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या दुकानासोबतच या पोर्टलच्या साहाय्याने आपल्या वस्तून ऑनलाईन पद्धतीने छोटे दुकानदारही सहज विकू शकतील. त्यामुळे, कोणताही ग्राहकाकडे रिटेल व्यापाऱ्यांकडून ऑनलाईन खरेदीचाही ऑप्शन उपलब्ध असेल. खरेदी केलेल्या वस्तूंचे पेमेंट करण्यासाठी या कंपनीने एचडीएफसी बँकेशी हातमिळवणी केली असून ‘ई-लाला’ ही वेबसाईट ग्राहक आणि छोटे व्यापारी या दोघांनाही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. ही वेबसाईट म्हणजे दोघांसाठीही एक प्लॅटफॉर्म आहे जिथे छोटे व्यापारी आपल्या वस्तू विकण्यासाठी ई-कॉमर्स पद्धतीचा वापर करू शकतात आणि ग्राहक आपल्याला हव्या त्या गोष्टी विकत घेण्यासाठी ग्राहकांनी केलेले पेमेंट हे थेट व्यापाऱ्यांपर्यंत पोहचणार आहे.