मुंबई : आता ‘ग्रॅच्युइटी’ गमावण्याची चिंता खाजगी कंपन्यांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करावी लागणार नाही. कारण, लवकरच ग्रॅच्युइटीसाठी असलेली पाच वर्षांची बंदी उठवली जाऊ शकते. तसेच सहा महिन्यांची प्रसूती रजा महिला कर्मचाऱ्यांनाही मिळू शकते.
खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांसाठी सरकार देणार खुशखबर…
केंद्र सरकार भारतातल्या कर्मचारी वर्गाला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलण्याच्या तयारीत असून कामगार कायद्यात यासाठी काही बदल होऊ शकतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व देशात उद्योग-व्यापाराला चालना देण्यासाठी सरकार काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रॅच्युइटीमध्ये असलेली पाच वर्षांची सक्ती उठवली जाऊ शकते. ही ग्रॅच्युइटी पोर्टेबल होऊ शकते. तसेच महिला कर्मचाऱ्यांना बाळंतपणासाठी सहा महिन्यांची सुट्टी दिली जाऊ शकते. आज, या विषयावर सरकार, उद्योग आणि कर्मचारी संगटना यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे.