व्होडाफोनने त्यांच्या युजर्ससाठी नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार व्होडाफोन युजर त्यांच्या आवडीचा फोननंबर निवडू शकणार आहेत. प्रीपेड आणि पोस्ट पेड अशा दोन्ही ग्राहकांसाठी ही सुविधा आहे. युजर व्होडाफोनच्या देशातील ५२ स्टोअर्स, २१२ मिनी स्टोअर्स, ४० हजार मल्टीब्रँड आऊटलेटस पैकी कुठेही जाऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
आवडीचा नंबर निवडण्याची व्होडाफोनची सुविधा
कंपनीचे बिझिनेस हेड अपूर्व मेहरोत्रा म्हणाले की पोस्टपेड युजरसाठी सुरवातीचे चार डिजिट तर प्रीपेड साठी सुरवातीचे पाच डिजिट फिक्स असतात. त्यानंतरचे आकडे युजर त्यांच्या पसंतीनुसार निवडू शकतील. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये लोकांना आपल्या आयुष्यातील कांही विशिष्ट संस्मरणीय घटनांच्या तारखा फोननंबर मध्ये जोडायला अधिक आवडते. हे लक्षात घेऊन कंपनीने ही सुविधा देऊ केली आहे.
Nice one. …