६ हजार कोटींचा बँक ऑफ बडोदामध्ये घोटाळा

bob
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात महत्वाची असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये सहा हजारहून अधिक कोटींचा हवाला घोटाळा झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. काही बडया उद्योजकांनी बँकेतील अधिका-यांशी संगनमत करून झोपडपट्टीतील मजूर, रिक्षावाले आणि फेरीवाले यांच्या नावे बनावट खाती उघडून काळा पैसा हा पांढरा पैसा केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्याला गेल्या वर्षीच्या मे महिन्यात सुरूवात झाली. गुरुचरण सिंह, चंदन भाटिया, संजय अगरवाल यासारख्या काही उद्योजकांनी बँक ऑफ बडोदच्या दिल्लीतील अशोक विहार शाखेचे सहाय्यक व्यवस्थापक एस. के. गर्ग, जैनिश दुबे यांच्याशी हातमिळवणी केली आणि त्यानंतर बनावट खातेधारकांचा शोध सुरू केला. गर्ग आणि दुबे यांनी उद्योजकांच्या वतीने दिल्लीतल्या झोपडपट्टीत राहर्णाया गरिबांना गाठून त्यांचे मतदान ओळखपत्रे मिळवली. त्याबदल्यात या लोकांना दर महिन्याला १० ते १५ हजार रूपये देण्याची लालचही दिली. दर महिन्यात काहीही न करता एवढे पैसे मिळणार असल्याने या लोकांनी फारसा विचार न करता आपली ओळखपत्रे दिली. या ओळखपत्रांच्या आधारे गर्ग आणि दुबे यांनी पॅन कार्ड बनवली आणि बँक ऑफ बडोदामध्ये बनावट कंपन्यांच्या नावे तब्बल ५९ खाती सुरू केली. यामुळे मात्र दिल्लीतील फेरीवाले, रिक्षावाले, झोपडपट्टीत राहणारे लोक या बनावट कंपन्यांचे संचालक आणि भागीदार झाले. त्यानंतर बनावट कंपन्यांच्या नावे पैशाचे व्यवहार सुरू झाले. बनावट खाती असलेल्या ५९ कंपन्यांनी सुका मेवा, कडधान्य आणि तांदूळ आयात केल्याचे कागदपत्रावर दाखविण्यात आले.

मात्र प्रत्यक्षात अशी कुठलीही आयात झाली नाही. यानुसार ऑगस्ट २०१४ ते ऑगस्ट २०१५ या एका वर्षात बँक ऑफ बडोदातील या खात्यांमध्ये ६ हजार १७२ कोटी डिपॉझिट करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा व सक्तवसुली संचलनातर्फे या घोटयाळ्याची चौकशी सुरू असून या प्रकरणी गर्ग आणि दुबे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

Leave a Comment