इमारतीतून जातो हायवे- सरकार भरते भाडे

japan
जपान हा तसा अनेक आश्चर्ये असलेला देश. ओसाकाच्या फुकुशिमा येथील गेट टॉवर ही इमारत अशीच आगळीवेगळी. या १६ मजली इमारतीचे वेगळेपण म्हणजे या इमारतीच्या ५ ते ७ या तीन मजल्यातून चक्क एक्स्प्रेस हायवे जातो. इमारतीच्या मध्ये हायवे आणि खालच्या वरच्या मजल्यांवर रहिवासी अशी ही जगातील एकमेव इमारत आहे.

या एक्स्प्रेस वे ला हैशिंग एक्स्प्रेस वे सिस्टीम असे नाव आहे. अजूसा सेकेई आणि यमातो मिशिहारा या दोन वास्तूरचनाकारांनी या २३६ फूट उंचीच्या इमारतीचे डिझाईन केले आहे. या इमारतीचा नकाशा १९८२ सालीच तयार केला गेला मात्र कायदेशीर अडचणींमुळे त्याचे बांधकाम ५ वर्षे थांबले होते. अखेर सिटी प्लॅन मध्ये कायद्यात बदल करून या बांधकामाला परवानगी मिळाली आणि १९९२ साली ते पूर्ण झाले. ही सर्व इमारतच एखाद्या सायन्स फिक्शनमध्ये शोभावी अशी आहे. या गोलाकार इमारतीची लिफट हायवे असलेल्या ५, ६ व ७ व्या मजल्यावर थांबत नाही. विशेष म्हणजे इमारतीच्या मालकाला सरकार या मजल्यांचे भाडे देते.

Leave a Comment