न्यूयॉर्क : फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाण्याच्या तयारीत आहे. मुलीच्या जन्मानंतर मार्क सुट्टी घेण्याचा प्लान करत आहे. २० तारखेला एका फेसबुक पोस्टमधून त्याने ही माहिती दिली आहे.‘कामात गुंतलेल्या व्यक्तींनी नवजात बाळांसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. एका संशोधनात हे बाळ आणि कुटुंबीयांच्या दृष्टीने आरोग्यदायी असल्याचे सिद्ध झाले आहे’ असे मार्कने पोस्टमध्ये लिहिले आहे. पोस्ट टाकल्यानंतर तासाभरातच सुमारे ७० हजार यूझर्सनी यावर लाईक केले आहे.