देशोदेशीचे दहा लोकप्रिय ब्रेकफास्ट

[nextpage title=”देशोदेशीचे दहा लोकप्रिय ब्रेकफास्ट”]
collarge
जगातील बहुतेक सर्व नागरिक सकाळचा ब्रेकफास्ट अथवा न्याहरी करतात. विविध ठिकाणी न्याहरीसाठी वापरले जाणारे पदार्थ तेथील वातावरण, भौगोलिक रचना, तेथे सहज मिळणारे अन्नपदार्थ यावर अवलंबून असते. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यात आणि प्रोसेस्ड फूडचे मोठ्या प्रमाणावर होत असलेले उत्पादन तसेच जगभरात सर्वत्र मिळू शकणारी तयार अन्नपाकिटे यामुळे न्याहरीची वरील व्याख्या बदलत चालली आहे. आता भारतातही इडली, पोहे उपमा, मऊ भात,पराठा किंवा शिळी भाकरी ही न्याहरी घेणारे लोक कमी प्रमाणातच दिसतात. या न्याहरीची जागा, कॉनफ्लेक्स, पिझ्झा, सिरीयल्स, विविध फळे, मुसळी यासारखे नवे पदार्थ घेताना दिसते. मात्र तरीही प्रत्येक देशाचे आपले स्वतःचे असे कांही पारंपारिक पदार्थ असतात व त्यातील लोकप्रिय न्याहरी पदार्थ कुठले हे जाणून घेणे मनोरंजक आहे.

१)भारत
1-india
भारतात भौगोलिक विविधता मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे न्याहरीचे पदार्थही विविध आहेत. दक्षिणी आणि उत्तर भारतीय असे दोन ठळक भेद येथे आहेत. दक्षिणी पदार्थ प्रामुख्याने शाकाहारी तर उत्तर भारतीय मिश्राहारी असा हा ठळक फरक आहे. मात्र भारतात सर्वत्र लोकप्रिय ब्रेकफास्टचा शोध घेतला तर इडली हा दाक्षिणात्य पदार्थ सर्वाधिक खाल्ला जातो असे दिसून येते. इडली बरोबरच डोसा, सामोसा या पदार्थांनीही लोकप्रियता मिळविली आहे. इडली डोसा सर्वसाधारणपणे चटणी, सांबार यांच्याबरोबर खाल्ला जातो.[nextpage title=”२)आफ्रिका”]

2-africa
हा खंड आकाराने प्रचंड मोठा त्यामुळे तेथेही पदार्थांचे वैविध्य भरपूर. येथे पारंपारिक काँटिनेंटल ब्रेकफास्ट कॉमन आहे. म्हणजे मासे, बीन्स, स्ट्यू, पोरिएज, अंडी, योगर्ट असे पदार्थ मध्यपूर्वेत म्हणजे ट्यूनिशिया सारख्या देशात प्रामुख्याने खाल्ले जातात. दक्षिण आफ्रिकी संस्कृतीत चहा कॉफी यासारख्या पेयांचा न्याहरीत समावेश केला जातो. त्याचबरोबर अंडी, बेकन, सॉसेज, उकडलेल्या बीन्स, टोमॅटो, ब्रेड असतात. युरोपियन संस्कृतीच्या प्रभावामुळे येथे हे पदार्थ न्याहरीत असतात. तर पश्चिम पूर्व आफ्रे केत बिगनेट, अंडी यांचे वेगवेगळे प्रकार न्याहरीत समाविष्ट असतात.[nextpage title=”३)दक्षिण व्हिएतनाम”]

2-south-viatnam
येथील सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे पो सूप. हे नूडल्स सूप करताना त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मटणाचे आवडीनुसार तुकडे घातले जातात. त्यात बीफ, चिकन, पोर्कचा समावेश असतो. शिवाय त्याला भाज्या, मिरची लिंबू घालून स्वादिष्ट बनविले जाते. दुसरा प्रकार म्हणजे बन. हेही पो सारखेच सूप मात्र त्यात तांदळाच्या शेवया नूडल्स म्हणून वापरल्या जातात. तिसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे मिन. यात स्टीकी राईस बरोबर नूडल्स असतात.[nextpage title=”४)आईसलंड”]

4-iceland
ऑईसलंड म्हटले की प्रथम आठवतो सामन मासा. हा महागडा आणि चविष्ट मासा येथे सहज उपलब्ध असतो मात्र न्याहरीत त्याचा सर्रास समावेश केला जात नाही. त्याऐवजी अंडी, ब्रेड, चीज, तसेच बकर्‍याच्या लिव्हर व ब्लड पासून बनविलेल्या सॉसेजेस आणि ओटमील यांचा न्याहरीच्या पदार्थात समावेश असतो. केफर हा चीजसारखा दाट पण सहज पसरविता येणारा पदार्थ त्यासोबत वापरला जातो. आजकाल येथे योगर्टचाही न्याहरीत समावेश केला जातो.[nextpage title=”५)ब्राझील”]

5-Brazil
सकाळी हलका आहार ही यांची खासियत. कारण येथे लंच भरभक्कम असते. कॉफी हवीच. न्याहरीत प्रामुख्याने ब्रेड, फळे, चीज, सिरीयल्स आणि भाजलेल्या म्हणजे बेक केलेल्या पदार्थांचा समावेश असतो. लोणी लावलेला फाओ फ्रान्सेस ब्रेड हाही लोकप्रिय प्रकार. चीजचा वापर प्रामुख्याने सँडविचमध्ये केला जातो व मोझेरीला चीज अधिक पसंत केले जाते. पपई हा कॉमन फळ प्रकार.[nextpage title=”६)जपान”]

6-japan
अमेरिकन लोकांसाठी जपानी न्याहरी हा इंटरेस्टींग प्रकार म्हणावा लागेल. कारण येथे भात हा मुख्य पदार्थ. प्रत्येक पदार्थासोबत भात हवाच. राईस पॉरिएज हेही कॉमन. मियो सूप, नॅटो म्हणजे आंबविलेले सोयाबीन मध्ये वेगवेगळी टॉपिंग्ज स्टीम राईससह दिली जातात. ग्रील्ड अथवा उकडलेला मासा, आम्लेट रोल, सुशी बार, लोणची व समुद्रवेली हे येथील लोकप्रिय न्याहरी मेन्यू आहेत.[nextpage title=”७)रशिया”]

7-russia
रशियात प्रामुख्याने साखर व लिंबू घातलेला काळा चहा म्हणजे कोरा चहा अधिक पसंत केला जातो. येथे कॉफीचे इतके प्रस्थ नाही. हिवाळा फारच कडक असल्याने उर्जा देण्यासाठी चीज, सॉसेजेस, सँडविचेच अधिक खाल्ली जातात. कारण येथे लवकर उजाडत नाही त्यामुळे अंधार असतानाच कामाला सुरवात होते. पोरिएज, ओटमील, बकव्हिट, तांदळाचे पॅनकेक त्यात मटण, कोबी, चीजचे फिलींग घेतली जातात. कारण ही अगोदर करून ठेवता येतात व गरजेनुसार गरम करून खाता येतात. कॉटेज चीज डपलिंग्ज जॅम, क्रिम अशी दोन्हीसोबत खाल्ली जातात. येथे आंबट क्रिम विशेष पसंतीचे आहे.[nextpage title=”८)स्पेन”]

8-spain
लेट नाईट कल्चर असलेला हा देश. त्यामुळे येथे लंच व रात्रीचे जेवण अधिक महत्त्वाचे. परिणामी न्याहरीचे फारसे प्रस्थ नाही.एकतर येथे रात्रीचे जेवण १० ते १२ या वेळात घेतले जाते त्यामुळे सकाळी सकाळी लोक फारसे भुकेलेले नसतात. लंचची वेळ साधारण दुपारी दोनची. येथे काँटिनेंटल ब्रेकफास्ट जास्त प्रमाणात घेतला जातो. त्यात क्राईसंट, जॅम, स्वीट रोल, सॉफट चीज, हॅम, लोण्यासह टोस्ट अशा पदार्थांचा समावेश असतो. तसेच हलके फ्राय केलेले व साखर व मध घातलेले चुरोज हेही लोकप्रिय आहेत. हा पदार्थ येता जाताही तोंडात टाकता येतो. ब्रेड पुडीग हा पोटभरीचा पदार्थ वेलदोडा, साखर, मध घालून केला जातो. ब्राझीलमध्ये दुधाची कॉफी अधिक आवडीने प्यायली जाते.[nextpage title=”९)ऑस्ट्रेलिया”]

9-Australia
इंग्रजांचा मोठा प्रभाव असलेला हा देश. साहजिकच येथले न्याहरीचे पदार्थही खूपसे इंग्रज न्याहरीसारखे. अंडी, बेकन, सॉसेज, बेकड बीन्स, टोमॅटो, मश्रूमचा वापर सढळपणे होतो तसेच व्हेजिमाईट हा टोस्ट वर खारट चवीचे स्प्रेड पसरलेला पदार्थही लोकप्रिय आहे. येथे सकाळी भक्कम न्याहरी घेतली जाते.[nextpage title=”१०)सौदी अरेबिया”]

10-saudi-arebia
येथे साग्रसंगीत न्याहरी करण्याची प्रथा आहे आणि घरातील सर्वांनी एकत्र बसून ती केली जाते. जमिनीवर बसण्याची व्यवस्था असते. मध्ये मोठे प्लॅस्टीक शीट घालून त्यावर खूप पदार्थ वेगवेगळ्या बाऊलमधून मांडले जातात. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार पदार्थ ताटलीत घ्यायचे. म्हणजे जणू बफेच. चीज, ऑलिव्ह जॅम, पाकिस्तानी नान, अंडी, ब्रेड, चपाती, पराठा यांचाही न्याहरीत समावेश असतो. बरोबर खास अरेबियन पद्धतीने बनविलेली कॉफी अथवा चहा असतो.

Leave a Comment