दिल्ली- लेनोवो जगातला पहिला ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन वायबे एस वन आज दिल्लीतील इव्हेंटमध्ये लाँच करत आहे. हा फोन यावर्षीच्या आयएफए इव्हेंटमध्ये सादर केला गेला होता. विशेष म्हणजे या फोनचा कॅमेरा खास हाय क्वालिटी सेल्फीसाठीच डिझाईन केला गेला आहे आणि त्यासाठी हार्डवेअरबरोबरच सॉफटवेअरची मदतही घेतली गेली आहे.
ड्युअल सेल्फी कॅमेर्याचा वाईबे एस वन आला
या फोनमधील एक कॅमेरा डिटेल काम करतो तर दुसरा इमेज रिफिक्स करतो. म्हणजे एक कॅमेरा फोटोच्या बॅकग्राऊंडवर काम करतो तर दुसरा सब्जेक्टवर फोकस करतो. दोन्हीच्या संयोगाने हाय क्वालिटी फोटो मिळतात. या फोनसाठी ३ जीबी रॅम, ५ इंची फुल एचडी डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास थ्री प्रोटेक्शन, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दली गेली आहे. अँड्राईड ५.० ओएसवर चालणारा हा फोन फोरजी, थ्रीजी, ब्ल्यूटूथसह अन्य कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देतो.