काशी विश्वनाथ मंदिरात विदेशी महिलांना नेसावी लागणार साडी

kashi-vishwanath
वाराणसी – विदेशी महिलांसाठी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला असून मंदिर परिसरात आता या महिलांना हाफ पँट, केप्री किंवा मिनी स्कर्ट परिधान करून जाता येणार नाही. अशा ड्रेसमध्ये येणाऱ्या विदेशी महिलांना चेंजिंग रूममध्ये जाऊन साडी परिधान करून येण्यास सांगितले जाणार आहे. सुमारे ६० हजार भाविक या मंदिरामध्ये दररोज येतात. त्यापैकी ३००० विदेशी नागरिक असतात. मंदिरात येणाऱ्या भारतीय महिलांसाठीही अशा प्रकारचे नियम आहेत का? हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.

गेल्या काही दिवसांत विदेशी महिला मंदिरामध्ये योग्य प्रकारचे कपडे परिधान करून जात नसल्याचे लक्षात आले होते. हा प्रकार भारतीय संस्कृतीच्या विरोधी असल्याचे स्थानिक संघटनांनी म्हणत त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर कमिश्नर रमेश गोकर्ण यांनी मंदिर परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर भारतीय संस्कृतीला हानी पोहोचेल असे कपडे परिधान करून मंदिरात जाण्यास परवानगी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment