होणार ‘किंगफिशर’ चा लिलाव

kingfisher
मुंबई : लवकरच विजय माल्या यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर विमान कंपनीच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार असल्याने विजय माल्यासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. माल्याच्या या संपत्तीचा लिलाव भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वातील १७ बँकांचे कंसोर्टियम करणार आहे. या बँकांचे किंगफिशर कंपनीवर तब्बल ८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज आहे.

जानेवारी २०१३ नंतर किंगफिशर विमान कंपनीने कोणत्याही स्वरूपात कर्जाची परतफेड केलेली नाही. या कर्जातील काही रक्कम वसुल करण्यासाठी येत्या ७ डिसेंबरला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंगफिशरच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये विमान कंपनीचे उपकरण आणि चल संपतीचा समावेश आहे. या संपतीमध्ये मुंबईचे किंगफिशर हाऊस आणि गोवा येथील किंगफिशर विलाचा समावेश आहे. या दोन्ही संपत्तीवर बँकांनी कब्जा केला आहे.
विजय माल्याने यांनी मे २००५ मध्ये मोठ्या थाटात किंगफिशर एअरलाइन्सची सुरुवात केली होती. मात्र या कंपनीला कधीही नफा कमविता आला नाही. बँकांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, किंगफिशरला कर्ज देणा-यांची सिक्योरिटी ट्रस्टी एसबीआय कॅप ट्रस्टी विमान कंपनीच्या कार्स, टोर्इंग मशीन्स, फोर्कलिफ्ट, ट्रॅक्टर्स, अग्निशामक आणि लोखंडाच्या सिड्यासारख्या साहित्याचा लिलावात समावेश असणार आहे. या साहित्याची निर्धारित किंमत ६५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. लिलावासाठीच्या नोंदणीची शेवटची तारीख २ डिसेंबर आहे.

Leave a Comment