जगातले सर्वोत्तम १० क्रेझी पिझ्झाज

[nextpage title=”जगातले सर्वोत्तम १० क्रेझी पिझ्झाज”]
collarge
जगभरात विविध प्रकारच्या पिझ्झांनी अगदी बालकांपासून वयोवृद्धयांची जीभ चांगलीच चाळवली आहे. मूळचा इटलीचा हा पदार्थ नवनव्या स्वरूपात खवैय्यांना भुलवितो आहे आणि न्याहरी, दुपारचे भोजन किंवा रात्रीचे जेवण अशा कोणत्याही वेळी पोटात जागा मिळवितो आहे. जगभरात आपल्या खास नावांमुळे आणि चवींमुळे क्रेझी किताब मिळविलेले हे दहा क्रेझी पिझ्झा तुमच्या माहितीसाठी.

असे समजते की जगातले सर्वात जुने व पहिले न्यूयार्क स्टाईल पिझ्झा जॉईंट १९०५ साली मॅनहटन भागात लोंबार्डि पिझ्झा नावाने सुरू झाले व आज ११० वर्षे उलटल्यावरही तेथे ग्राहकांची तुफान गर्दी असते.

१)कुकी डोव्ह क्रस्ट
1-Cookie-Dough-Crust
दक्षिण कोरिया – मिस्टर पिझ्झा या साऊथ कोरियन बेस्ड पिझ्झा चेनमधील मेन्यूवर खवैय्यांसाठी अनेक ऑप्शन्स आहेत. रोमँटिक काँबो, लव्हली पीस, सिक्रेट गार्डन अशा नावाची ही ऑप्शन्स महागडीही आहेत. मात्र त्यातही त्यांचा सर्वात मोठा शोध म्हणजे द ग्रँड प्रिक्स कुकी क्रस्ट पिझ्झा. गोड कुकीजच्या क्रस्टवर श्रींप्स, बटाटे, भोपळ्याच्या बिया, बेदाणे अशी सजावट असलेला हा आगळावेगळा पिझ्झा खाण्यासाठी दक्षिण कोरियातच जावे लागते कारण अन्यत्र तो मिळतच नाही.[nextpage title=”२)चॉकलेट कव्हर्ड हनीकोंब”]

2-Chocolate-Covered-Honeyco
बेल्जियम- या चॉकलेट पिझ्झासाठी तुमची किमान ३० डॉलर्स मोजण्यची तयारी हवी बरं का! गॉरमेट चॉकलेट पिझ्झा कंपनीची ही खास ट्रीट हेवनली हनीकोंब चॉकलेट पिझ्झा या नावाने विकली जाते.यात १६ स्लाईस असतात व ते दूध, व व्हाईट चॉकलेट असते.त्यात मधमाशीच्या पोळ्याच्या आकाराचे गोळे, व्हॅनिला फज, मिल्क चॉकलेटचे बारीक तुकडे असतात व पिझ्झाचा बेस स्पेशल बेल्जियन मिल्क चॉकलेटपासून बनविला जातो.याचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे हा पिझ्झा योग्य रितीने ठेवला तर तो ९ महिन्यांपर्यंत खराब न होता टिकतो. हा पिझ्झा पूर्ण शाकाहारी आहे मात्र तो साखर आणि कॅलरीजनी तुडुंब भरलेलाही आहे. तेव्हा जरा बेतानेच खा.[nextpage title=”३)चीज बर्गर क्राऊन क्रस्ट”]

3-Cheeseburger-Crown-Crust
अबुधाबी – पिझ्झा हट या कंपनीने जगभर आपला ठसा उमटविताना मध्यपूर्वेवरही गारूड केले आहे. परफेक्ट ग्रील्ड मिनी बर्गर चे सहज घास घेता येईल अशा आकारात क्रस्टचे गोल भाग केलेल्या या पिझ्झावर आपल्या आवडीचे केचप, मस्टर्ड सॉस अथवा पिझ्झा हटचा खास सॉस घालून त्याची चव वाढविता येते. यात बीफ तुकडे, लेट्यूस, टोमॅटो, कांदे, चीज ने हा पिझ्झा परिपूर्ण केला जातो. अमेरिकेत प्रथम हा पिझ्झा तयार केला गेला.[nextpage title=”४)स्वँप क्रिटर्स”]

4-Swamp-Critters
यूएसए-फोर्ट मायर्स फ्लोरिडा आणि न्यूयार्क स्टाईल पिझ्झा यांचे हे आगळेवेगळे काँबिनेशन. गार्लिक बटर क्रस्ट, टोमॅटो सॉस व मोझेरिला चीज यांनी युक्त हा पिझ्झा क्रेझी बनतो तो त्यावरील तीन प्रकारच्या टॉपिग्जमुळे. यात फ्रेश स्वँप म्हणजे मगर किवा सुसर, अजगर व डोके छाटलेले बेडुक यांचे टॉपिंग केले जाते.[nextpage title=”५) गिनिआ पिग”]

5-Guinea-Pig
इक्वेडोर – स्थानिक परंपरागत पदार्थांवर गुजराण करणार्‍या येथल्या लोकांना सुपरमार्केटची दारे खुली झाली. जगभरातील भाज्या, फळे, मीट उपलब्ध झाल्यानंतर आपल्या स्थानिक स्वादात त्यांची अॅडिशन करून त्यांनी ही स्थानिक खासियत तयार केली. क्यू किवा गिनिया पिग म्हणजे डूक्कर टॅको, ग्रील्ड पिझा मध्ये टॉपिंग स्वरूपात वापरले जाते. ते व्यवस्थित शिजवलेले असते व त्यामुळे मऊ आणि हलके बनते. विशष म्हणजे हे मटण अधिक प्रोटीनयुक्त आहे व त्यात फॅटचे प्रमाणही कमी आहे. त्यात कोलेस्टोरॉल नाही. तसेच ही डुकरे वाढविताना येणारा खर्च अन्य जनावरे पाळण्यापेक्षा कमी आहे व त्यांना वाढविणे हे पर्यावरणपूरकही आहे.[nextpage title=”६)स्क्वीड इंक”]

6-Squid-Ink
जपान -जपानमधील लोकांना समुद्री भाज्या व समुद्री जीव रोजच्या आहारात हवेतच. खेकडे, मासे, श्रींप्स यांचे जपानी आहारातील योगदान मोठे आहे. जपानमध्ये पिझ्झाही तितकाच लोकप्रिय प्रकार आहे मात्र ओकोनोमियाकी पॅन केकवर समुद्री भाज्यांचे टॉपिग असलेला हा पिझ्झा थोडा हटके आहे. यात पिझ्झावर आपल्या आवडीचे मटन, सॉस घालता येतेच पण स्क्वीड इंक हा प्रकार अधिक लोकप्रिय. या समुद्री भाज्या किंवा वेली काळ्या रंगाचा शाईसारखा पदार्थ सोडतात. आपण आपल्याकडे जांभळे खाऊन जशा जिभा, ओठ, दात जांभळे करून घेतो, तसेच जपानी मुले या स्क्वीड इंकने त्यांच्या जीभा, हात, ओठ काळे करून घेतात. हा रंग थोड्यावेळात जातो. मात्र त्यांच्या नादाने मुले या पिझ्झाचा मनोमन स्वाद लुटतात.[nextpage title=”७)पेपर कांगारू”]

7-Pepper-Kangaroo
ऑस्ट्रेलिया – सिडनीतील सर्वात जुना पब म्हणून ओळखले जाणार्‍या ऑस्ट्रेलिया हेरिटेज हॉटेलमध्ये कल्पनाही करता येणार नाहीत असे पिझ्झा मेन्यूवर आहेत. त्यातील लोकप्रिय प्रकार म्हणजे पेपर कांगारू. जाड अथवा पातळ अशा आपल्या आवडीच्या क्रस्टवर स्थानिक ऑस्ट्रेलियन मिरीत मुरविलेले कांगारूचे मटण घालून ते क्रेन बेरीजसोबत बेक केले जाते. जगात हा प्रकार कुठेच मिळत नाही व त्यासाठी किमान २० डॉलर्स मोजण्याची ऐपतही हवीच.[nextpage title=”८)व्होल श्रिंप चीज बाईट पिझ्झा”]

8-Whole-Shrimp-Cheese-Bite-
जपान, कोरिया – पिझ्झा हट मध्ये मिळणार्‍या या पिझ्झामधील घटक पदार्थ खास उल्लेख करावा असे नाहीत मात्र पिझ्झा सादर करण्याची पद्धत मात्र नककीच क्रेझी आहे. पोकळ डोव्ह किवा मळलेल्या मिश्रणात पूर्ण शिंपा घातल्या जातात. त्या मोझेरिला चीजने पॅक करून बेक केल्या जातात व सोनेरी रंग आला की सर्व्ह केल्या जातात.[nextpage title=”९)क्रंची किकॅडास”]

9-Crunchy-Cicadas
यूएसए- या पिझ्झात पंख असलेले किकॅडास नावाने किडे टॉपिंगमध्ये घातले जातात व ते खाताना कुरकुर असा आवाज येतो. मिसुरी भागात उन्हाळ्याच्या दिवसात हे कीडे झाडांवर गुणगुण करत असतात व रात्री खवैय्यांच्या तोंडात कुरकुर करतात. सॅलड टॉपिंगमध्येही ते वापरले जातात. मात्र किडे गोळा करताना संबंधित झाडांवर वेलींवर किटकनाशके फवारलेली नाहीत ना याची खबरदारी घ्यावी लागते.[nextpage title=”१०) चोवीस कॅरेट गोल्ड लीफ”]

10-24-Carat-Gold-Leaf
ईबे- जेम्स बाँडचा सन्मान अशी ओळख असलेल्या या पिझ्झाला रॉयल ००७ असे नाव दिले गेले आहे. याचा अनुभव एकदा तरी घ्यायला हवा कारण यात खरोखरच २४ कॅरेट गोल्ड लिफ वापरले जाते. १२ इंची पिझ्झा ईबेवर लिलावात विकला गेला तेव्हा त्याला तब्बल ४२०० डॉलर्सची किंमत मिळाली. इटलीच्या रोममधील एका वकीलाने तो खरेदी केला होता. या पिझ्झात गोल्ड लिफ चेरी, कासव, सामन मासा, बीफ, चिकन, अंडी अशा अनेक पदार्थांचा वापर केला जातो व हे एक महागडे डेझर्ट म्हणूनही प्रसिद्ध आहे.

Leave a Comment