कीबोर्ड क्षेत्रातील क्रांती- लेजर की बोर्ड

lazer
स्टायलीश, ब्ल्यू टूथ, यूएसबी व अन्य कनेक्टीव्हीटी ऑप्शन देणारे लेझर की बोर्ड बाजारात दाखल झाले असून ऑनलाईन स्टोअर्सवर ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ४० ग्रॅम वजनाचे हे कीबोर्ड ४५०० रूपयांपासून पुढे उपलब्ध आहेत आणि अनेक कंपन्यांची मॉडेल्सही चॉईससाठी आहेत. प्रोजेक्शन व्हर्च्युअल की बोर्ड या नावाने ते ओळखले जातात.

या कीबोर्ड सोबत एक बॉक्स येतो. त्यामुळे हा कीबोर्ड युजर कुठेही नेऊ शकतो तसेच प्रवासातही वापरू शकतो. अत्यंत आकर्षक दिसणार्‍या या कीबोर्डमध्ये लेझर किरणांच्या सहाय्याने व्हर्च्युअल की बोर्ड बनतो. युजर त्यावर सहज काम करू शकतो मात्र त्यासाठी सपाट पृष्ठभागाची आवश्यकता असते. या डिव्हाईसमधून लाल रंगाचे किरण येतात. टाईप करताना बीप असा आवाजही येतो. बॅटरीवर तो ऑपरेट होतो आणि आयफोन, आयपॅड, स्मार्टफोन, टॅब्लेट वा अन्य ब्ल्यू टूथ डिव्हायसेसमध्ये त्याचा वापर करता येतो.

Leave a Comment