रशियन युराल बाईक -जगभर मिळते पण भारतात नाही

ural
युराल या साईडकारसह मोटरबाईक उत्पादक रशियन कंपनीने युराल २०१५ ची तीन नवी मॉडेल्स बाजारात आणली आहेत. ही कंपनी मोटरसायकल उत्पादनातील ख्यातनाम कंपनी असून त्यांची ही नवी बांईक ७४९ सीसी इंजिनसह आली आहे. विशेष म्हणजे ही मोटरसायकल जगभरात उपलब्ध आहे मात्र ती भारतात मिळत नाही.

युरालने युराल २०१५ गिअरअप, युराल पेट्रोल २०१५ व युराल सीटी अशी तीन नवी मॉडेल्स सादर केली आहेत. या सर्व बाईकसाठी ७४९ सीसीचे मजबूत इंजिन दिले गेले आहे. गिअरअपसाठी दोन सिलींडरचे फोर स्ट्रोक इंजिन असल्याने ती ओबडधोबड रस्त्यावरही आरामात चालू शकते. तिची किंमत १५९९९ अमेरिकन डॉलर्स म्हणजे १० लाख रूपये आहे.

युराल पेट्रोलसाठी इलेक्ट्रीक व किक स्टार्ट अशा दोन्ही सुविधा आहेत. मॅन्युअल ट्रान्समिशन, चार फॉरवर्ड व १ रिव्हर्स गिअर असलेली ही बाईक १५५९९ डॉलर्समध्ये उपलब्ध करून दिली गेली आहे. तर युराल सीटी १२९९९ डॉलर्स म्हणजे साधारण ८.५ लाख रूपयांत उपलब्ध आहे. या सर्व मोटरसायकलसाठी दोन वर्षांची वॉरंटी कंपनीने दिली आहे.