नवी दिल्ली : इसिसचे फेसबुक अकाउंट सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकने डिलीट केले असले तरी मात्र हे अकाउंट डिलीट केल्याप्रकरणी नंतर चक्क माफी देखील मागितली आहे. आता तुम्ही म्हणाल इसिसचे अकाउंट डिलीट केल्यानंतर माफी का मागावी? अकाउंट डिलीट केले ही तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र हे अकाउंट इसिस या दहशतवादी संघटनेचे नव्हते तर सँन फ्रँसिंस्कोमध्ये राहणाऱ्या तरुणीचे होते. हैराण झालात ना तुम्हीही ?
‘इसिस’ची मागितली फेसबुकने माफी
सँन फ्रँसिंस्कोमध्ये पेशाने सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या इसिस अंकली या तरुणीच्या नावावरुन फेसबुकचा सगळा गोंधळ झाला. तिचे फेसबुकवरील अकाउंट हे इसिस दहशतवादी संघटनेचे समजून फेसबुकने हे अकाउंट डिसेबल करुन टाकले. त्यानंतर या तरुणीने आपण दहशतवादी नसून इसिस हे आपले नाव असल्याचे फेसबुकला ट्विटरवरुन स्पष्ट केले.
तसेच तिने तिच्या पासपोर्टची कॉपीही पुराव्यासाठी फेसबुकला पाठवली. तसेच फेसबुकला खडेबोलही सुनावलेही. सारख्या नावामुळे गोंधळलेल्या फेसबुकने नंतर तिची माफी मागितली आणि तिचे अकाउंट सुरु केले आहे. अकाउंट पुन्हा सुरु कऱण्यासाठी आयसिसला तीनवेळा तिची वैयक्तिक माहिती फेसबुकला द्यावी लागली. या घटनेनंतर इसिस नावाच्या अन्य व्यक्तींनीही नाराजी व्यक्त केली.