माइक्रोमॅक्सचा फोर जी स्मार्टफोन बाजारात!

micromax
नवी दिल्ली : भारतीय मोबाईल हॅन्डसेट निर्माता कंपनी ‘माइक्रोमॅक्स’ने आपला पहिला वहिला ‘कॅनव्हास एक्सप्रेस ४ जी’ स्मार्टफोन लॉन्च केला आहे. माइक्रोमॅक्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता फोर जीचीच बाजारात चलती असल्यामुळे, आता फोर जी गॅझेटसवरच माइक्रोमॅक्सचाही फोकस असेल. ऑनलाईन माध्यमातून ४० टक्के फोर जी स्मार्टफोन विकले जात आहेत. ऑनलाईन विक्री आणि कमी किंमत ही माइक्रोमॅक्सची स्ट्रॅटर्जी असल्यामुळे, आता हळूहळू कंपनी टूजी फोन बनवणे बंद करणार आहे.

फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला असून यामध्ये एक गीगाहर्टझ मीडियाटेक एमटी ६७३५ प्रोसेसर आणि २ जीबी डीडीआर ३ रॅम उपलब्ध आहे. पाच इंचाचा डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये आठ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि दोन मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये १६ जीबीचे इंटरनल स्टोअरेज उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन केवळ ६,५९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment