तुम्हाला हे माहिती आहे काय?

[nextpage title=”तुम्हाला हे माहिती आहे काय?”]
collarge
जगाची ओळख करून घ्यायची म्हणजे अनेक आयुष्ये वेचावी लागतील इतके मोठे काम. वास्तविक सगळ्या जगाची माहिती असायलाच हवी असे कांही नाहीच. तरीही जगातील प्रत्येक देश कांही ना कांही खास बाबींसाठी ओळखला जातो व त्या बाबी सतत चर्चेत असतात. लष्करी सामर्थ्यामुळे, आर्थिक सामर्थ्यामुळे, निसर्गसौदर्यासाठी, विविध विचित्र चालीरितींसाठी, गरीबी, आधुनिकतेचे वारे न पोहोचलेले, फॅशन, संशोधन या क्षेत्रात आघाडी अशीही देशांची ओळख असते. आज मात्र आम्ही तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी या देशांची वैशिष्ठ्ये कशा बनल्या आहेत याची ओळख करून देत आहोत.

1-italy
१)इटली
या देशात एका खास प्रकारच्या चीजवर बॅका लोन देतात. म्हणजे आपण सोने चांदी ठेवून लोन घेतो तसेच चीज बँकेत गहाण ठेवून येथे लोन दिले जाते.[nextpage title=”२)सिंगापूर”]

2-singapore
या छोट्याशा देशात नागरिकांनी च्युईंगम चघळून ते रेल्वे ट्रॅकवर अथवा सार्वजनिक जागी थुंकल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्या दूर करण्यासाठी येथील सरकारने च्युईंगम खरेदी विक्रीवर बंदी आणली आहे. चुकून तुम्ही च्युईंगमचा वापर करताना दिसलात तर १ हजार डॉलर्सचा दंड केला जातो.[nextpage title=”३) आफ्रिका”]

3-flag
आफ्रिकेतील चाड आणि रोमानिया या दोन्ही देशांचा राष्ट्रध्वज अगदी एकसारखा आहे. तसेच इंडोनेशिया आणि मोनॅको या देशांचा राष्ट्रध्वजही एकसारखा आहे.[nextpage title=”४)बर्म्युडा”]

4-rain
येथील प्रत्येक घर पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण आहे. म्हणजे प्रत्येक घर स्वतःचे पिण्याचे पाणी गोळा करते. त्यासाठी येथे रेन कॅचिंग सिस्टीम प्रत्येक घरात बसविली गेली आहे.[nextpage title=”५) इजिप्त आणि सुदान”]

5-egypt
इजिप्त आणि सुदान या दोन देशांच्या मध्ये एक असा भूभाग आहे ज्यावर दोन्ही पैकी कुठल्याच देशाने मालकी हक्क सांगितलेला नाही.[nextpage title=”६) बहारीन”]

6-bahrin
बहारीन सरकारने गुगल अर्थ वर बंदी घातली आहे. त्यामागचे कारण असे की गुगल अर्थ मुळे जगातील गरीब श्रीमंत यांच्यातील भेद नागरिकांना ठळकपणे दिसून येऊ शकतो.[nextpage title=”७)नॉर्वे”]

7-norway
नॉर्वेमध्ये किमान मजूरी दर निश्चित नाहीत. मात्र येथील मॅकडोनाल्ड मध्ये काम करणार्‍या कर्मचारयाला दर तासाला १ हजार ते १५०० रू.दिले जातात.[nextpage title=”८) स्वित्झर्लंड”]

8-swiss
स्वित्झर्लंडमध्ये कॉपीराईट असलेला मजकूर डाऊनलोड करणे बेकायदा नाही. म्हणजे कॉपी राईट असलेला कोणताही मजकूर तुम्ही डाऊनलोड केला तर तुमच्यावर कॉपी राईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही.[nextpage title=”९) नेदरलँड”]

9-line
नेदरलँडमध्ये अंधारातही चमकू शकतील असे रस्ते बनविण्याचा प्रयोग हाती घेतला गेला आहे. त्याला ग्लोईंग लाईन्स असे नांव दिले गेले आहे.

Leave a Comment