वजन वाढविणारे १० “डाएट फूड”

[nextpage title=”वजन वाढविणारे १० “डाएट फूड””]
collarge
वाढलेले वजन आटोक्यात आणून फिट राहण्यासाठी जगभरात बहुतेक सर्वजण व्यायाम आणि डाएटचा पर्याय स्वीकारतात. मात्र सतत कमी अन्न खाणे अथवा चटकमटक खाण्यावर कंट्रोल ठेवणे कुणालाच शक्य होत नाही. माणसाची ही कमजोरी हेरून अनेक कंपन्यांनी त्यांची डाएट फूडस बाजारात आणली आहेत. ही उत्पादने आरोग्यदायी आणि पौष्टीक असल्याची जाहिरातही मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि ती अत्यंत आकर्षक स्वरूपात ग्राहकांसमोर आणली जातात. मात्र बरेच वेळा या डाएट फूडचा वापर करून आणि जिममध्ये बराच घाम गाळूनही महिनोनमहिने वजनाचा काटा आहे त्याच वजनावर स्थिर दिसतो तर कांहीवेळा वजन वाढल्याचाही अनुभव येतो. त्यामळे आलेल्या नैराश्यातून पुन्हा जंकफूड सेवनाकडे कल वाढतो असाही अनुभव अनेकांना येतो.

अशावेळी गरज आहे ती नीट विचार करण्याची. असे घडत असेल तर व्यायामाला दोष देऊ नका तर डाएट फूट म्हणून तुम्ही जो आहार घेताय तो तपासून पहा. आज वजन उतरविण्यासाठी निरूपयोगी अशा १० पदार्थांची यादी खास तुमच्यासाठी.

1-Breakfast-Cereals
१)ब्रेकफास्ट सिरीयल्स
सकाळी सकाळी कांही तरी ताजे खाण्यापेक्षा वजन उतरविण्याचे भूत चढलेल्या व्यकती नित्यनेमाने या सिरीयल्स आहारात घेतात. मात्र वजन उतरवायचे असेल तर हा पदार्थ अत्यंत निरूपयोगी आणि धोकादायक आहे. यात रिफाईंड कर्बोदके आणि साखर यांचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे रक्तातली इन्शूलिनची पातळी वाढते व ब्लड शुगर खाली जाते. परिणामी कांही वेळातच कांही तरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते आणि चॉकलेट, कुकीज असे पदार्थ खाल्ले जातात. परिणामी वजनवाढ होऊ शकते.[nextpage title=”२)शुगर फ्री कुकीज, कँडीज”]

2-Sugar-Free-Cookies-&-Cand
ही वजन उतरविण्यासाठी उपयुक्त अशी जाहिरात असलेली आणखी एक फसवणूक. यात साखर नाही ही जाहिरात खरी असते मात्र फॅटचे प्रमाण खूपच अधिक असते ही माहिती दिली गेलेली नसते.चॉकलेट चीप कुकीज हा ब्रँड लोकप्रिय आहे मात्र यातील प्रत्येक कुकी मध्ये ९ ग्रॅम फॅट असते आणि त्यामुळे १६० कॅलरीज पोटात जातात. शुगर फ्री कँडीज मध्ये सॉर्बिटॉल हे रसायन असते व त्यामुळे अनेकदा डायरिया अथवा उलट्या होतात व आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होते.[nextpage title=”३) व्होलव्हीट ब्रेड”]

3-Whole-Wheat-Bread
अखंड धान्याचा पाव मैद्याच्या पावापेक्षा नक्कीच आरोग्यदायी आणि पौष्टीक आहे यात वाद नाही. मात्र बाजारात येणार्‍या या प्रकारच्या ब्रेडचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे हा पाव कधीच व्होलव्हीट पासून बनविला जात नाही.धान्याचे दळून बारीक पीठ करून तो बनविला जातो. त्यामुळे तो पचायला हलका बनला तरी त्याच्या सेवनाने रक्तशर्करा वाढते. म्हणजे मैद्याच्या ब्रेडसारखाच तो असतो. नाही म्हणायला यात तंतूमय पदार्थ मैद्याच्या ब्रेडच्या तुलनेत थोडे अधिक असतात त्यामुळे तो थोडा जास्त पौष्टीक असतो. मात्र वजन उतरविण्यासाठी या ब्रेडचे सेवन कांही फारसे फायद्याचे ठरत नाही.[nextpage title=”४) ग्रॅनोला”]

4-Granola
ग्रॅनोलात खरे तर खोड काढावी असे कांही नाही. मात्र सर्रास ब्रेकफास्ट साठी ते खाल्ले जात असतील तर ते योग्य नाही. १ कप ग्रॅनोलामध्ये २८ ग्रॅम फॅट असते व त्यातून ५६० कॅलरीज पोटात ढकलल्या जातात. त्यात दूध अॅड केले तर मग कॅलरीज अधिक वाढतात. उत्पादक त्यातही उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून कांही हिकमती लढवितात. धान्याच्या कडा कापल्या जातात त्यामुळे ते आरोग्यदायी राहात नाही. ग्रॅनोला बारमध्ये नटस, ओटस, साखर आणि तेल असतेच. पॅकेटमध्ये मिळत असल्याने ते गरजेपेक्षा अधिक खाल्ले जाते आणि वजन उतरविण्यासाठी त्यामुळे ते निरूपयोगी ठरते.[nextpage title=”५)लो फॅट योगर्ट”]

5-Low-Fat-Yogurt
योगर्ट हे आरोग्यासाठी उत्तम असले तरी लो फॅट योगर्ट ही शुध्द फसवणूक आहे. कारण ते प्रोसेस्ड असते. यात फॅट काढल्यामुळे ते बेचव होते व त्याला चव आणण्यासाठी गोडी येणारे पदार्थ अॅड केले जातात. त्यातून डेअरी फॅटमुळे खरच वजन वाढते का यावर फार संशोधन झालेले नाही. त्यामुळे वजन उतरविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी लो फॅट योगर्टपेक्षा नेहमीचे दही खाणे केव्हाही हितकरच.[nextpage title=”६)फ्रूट ज्यूस “]

6-Fruit-Juice
फळांचे रस आरोग्यदायी असले तरी नेहमीसाठी हे खरे नाही. त्यातून स्थानिक दुकानांतून ते खरेदी केले जात असतील तर त्यात बरेचवेळा फळांचा स्वाद असणारी रसायने, साखर व पाणी यांचे मिश्रण दिले जाते. प्रत्यक्षात फळे नसतातच.त्यामुळे असे ज्यूस धोकादायक ठरतात. मात्र अगदी फळे आणून घरी रस काढला तरीही ते फारसे आरोग्यदायी ठरत नाही असे संशोधन सांगते.कारण अख्खे फळ खाल्ले तर त्यातून तंतूमय पदार्थ पोटात जातात व फळातील शर्करा बेताबेताने रक्तात मिसळते मात्र रस काढून प्यायले तर ही साखर कांही सेकंदात रक्तात शोषली जाते व त्यामुळे रक्तशर्करा वाढते. ज्यांना वजन उतरविण्यासाठी फळांचे सेवन करायचे असेल त्यांनी अधिक पाणीदार फळे अखंड स्वरूपात व शक्य असेल तेथे सालीसकट खावीत.[nextpage title=”७)डाएट सोडा”]

7-Diet-Soda
डाएट कोक आणि डाएट सोडा हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत निरूपयोगी असे पदार्थ आहेत हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. यात साखरेऐवजी स्विटनरचा वापर केला जातो त्यामुळे ती कदाचित कॅलरी फ्री असू शकतात मात्र त्यातील सोड्यामुळे भूक वाढते. डाएट कोक प्यायल्यानंतर भूक अधिक लागते याचा अनुभव अनेकांना आला असेल. भरपूर चिझ आणि विविध टॉपिगसह पिझ्झा आणि त्यासोबत डाएट कोक घेत असाल तर वजन उतरणार नाही तर उलटे वाढेल. त्याऐवजी आपल्या जीवनशैलीत आणि खाण्यांच्या सवयीत हळूहळू बदल करणे अधिक फायदेशीर ठरेल.[nextpage title=”८)ट्रेल मिक्स”]

8-Trail-Mixes
ट्रेल मिक्स हे ताबडतोब उर्जा देणारे आहे यात कांही शंकाच नाही. मात्र वजन उतरविणार्‍या व्यक्तीला त्याची गरज किती याचा विचार करायला हवा. यात सुकामेवा, वेगवेगळी नटस असतात आणि ते नक्कीच आरोग्यदायी आहे. पण कुणाला तर ज्यांना हायकींग, ट्रेकींग, खेळ अशा सारखा खूप उर्जा खर्च करणारा व्यायाम करायचा असतो त्यांना. एका जागी बसून बैठे काम करणार्‍यांना स्नॅक्स म्हणूनही ते उपयुक्त नाही. त्यात कर्बोदके आणि फॅटसचे प्रमाण अधिक असल्याने त्यातून हालचाल कमी असणार्‍यांना जादा ऊर्जा मिळते व वजन वाढू शकते.[nextpage title=”९)ग्लूटेन फ्री”]

9-Gluten-Free-Junk-Food
ग्लुटेन फ्री जंकफूड हे लेबलच ही जाहिरात कशी फसवणूक करते हे सांगण्यासाठी पुरेसे आहे. ते भलेही ग्लुटेन फ्री असेलही पण ते जंकफूड आहेच. आणि वजन कमी करण्यासाठी जंकफूडचे सेवन निरूपयोगीच. परिणामी ग्लटेन असलेल्या पदार्थांइतकेच हे जंकफूड धोकादायक ठरते. उत्पादक ग्लूटेन फ्री म्हणून जी उत्पादने तयार करतात त्यात रसायनांचे प्रमाण अधि्क असते आणि साखर व रिफाईंड कर्बोदकेही अधिक प्रमाणात असतात.[nextpage title=”१०)।व्हेजी चिप्स”]

10-Veggie-Chips
बटाटा चीप्स म्हणजे तोंडाला पाणी सुटणारा आणि वजन वाढविणारा पदार्थ. दुधाची तहान ताकावर भागवावी त्याप्रमाणे बटाटा चीप्सप्रेमी त्यांची ही भूक व्हेजी चिप्सवर भागविण्याचा व आपण कांही तरी हेल्दी खाल्ले असे समाधान मिळवितात.मात्र त्यांना कल्पनाही असते की बटाटा चीप्स इतकेच हे व्हेजी चिप्स कॅलरीज देतात. अनेक उत्पादक तर बटाट्याचे पीठ किवा मक्याचे पीठ लावून तळलेले पदार्थ व्हेजी चिप्स म्हणून विकतात. तेव्हा असे तयार पाकिट उघडण्यापूर्वी त्यात कोणत्या भाज्या आहेत याची यादी वाचा आणि घटक पदार्थात कॉनफ्लोअर अथवा पोटॅटो फ्लोअर असा उल्लेख असेल तर ते खरे हेल्दी व्हेजी चिप्स नाहीत याची खात्री बाळगा.

Leave a Comment