आरबीआय बॅंक कर्मचाऱ्यांचा आज संप

rbi
मुंबई – आज रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवित संपावर गेले आहेत. आर्थिक सुधारणा धोरण केंद्र सरकारने राबविले असून कर्मचाऱ्यांसाठी हे धोरण योग्य नसल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

बॅंक कर्मचाऱ्यांच्या आजच्या या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता असून बँक कर्मचाऱ्यांनी मागील आठ वर्षांपासून एकही आंदोलन केले नसल्यामुळे हा संप यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने एकचलन विषयक धोरण समिती प्रस्तावित केली असून या समितीत सरकारी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी या सदस्यांना विरोध दर्शविला आहे. बँकेच्या निर्णय प्रक्रियेत सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आरबीआय अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे संयोजक समीर घोष यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी आज संप पुकारण्यात अल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन धोरणामध्येही सुधारणा करण्याची मागणी घोष यांनी केली.

Leave a Comment