हिंगोलीत नासाचे अवकाश संशोधन केंद्र !

nasa
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात अवकाश आणि भूगर्भ क्षेत्रात काम करणा-या अमेरिकेच्या ‘नासा’चे संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. या अनुषंगाने औंढा तालुक्यातील सहा गावांचा ‘नासा’ च्या शास्त्रज्ञांच्या पथकाने दौरा करून पाहणी केली.

जागतिक पातळीवर संशोधन क्षेत्रात नावाजलेल्या ‘नासा’ संस्थेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यात संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. अवकाश आणि भूगर्भ अशा दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये काम करणा-या‘नासा’ च्या भारतातील या संशोधन केंद्रात दोन्ही प्रकारचे संशोधन केले जाणार आहेत. जवळपास ३५० हेक्टर जमिनीवर हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या अनुषंगाने आज नासातील भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ तरुण सौरदीप यांच्यासह फ्रॉड बेहजाद असिरी, फ्रेडरिक रॅब हे दोन अमेरिकी शास्त्रज्ञ आणि पुण्याच्या आयव्हीसीसीएचे शरद गौरव यांच्या पथकाने बुधवारी औंढा तालुक्यातील गांगलवाडी, दुधाळा, अंजनवाडा, काशी तांडा, काळापाणीतांडा या गावांचा दौरा करून शिवारातील माळरानांमधील मातीचे व पाण्याचे निरीक्षण केले. त्यांच्या सोबत लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, औंढा नागनाथचे तहसीलदार शाम मदनुरकर व काही कर्मचा-यांचे पथक होते.

Leave a Comment