झारखंडमध्ये गायींना मिळणार ओळखपत्रे

cows
रायपूर- नागरिकांना ज्याप्रमाणे आधार कार्ड दिली जात आहेत त्याच धर्तीवर झारखंडमध्ये गायींना १२ डिजिट युनिक आयडेंटिटी नंबर असलेली ओळखपत्रे दिली जाणार आहेत. ही कार्डे गायींच्या कानाजवळ बसविली जातील व त्यावर गायीचा फोटो, अंदाजे वय, रंग व मालकाचे नांव असेल. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या सूचनांनुसार ही ओळखपत्रे दिली जाणार असून त्यामुळे गायींच्या तस्करीवर नियंत्रण येईल तसेच त्यांचे ब्रीड व दुध उत्पादनाची आकडेवारीही उपलब्ध होऊ शकेल असे सांगितले जात आहे.

झारखंडच्या एजन्सी फॉर कॅटल अॅन्ड बफेलोची त्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केली गेली आहे. या संस्थेचे सीईओ गोविंद प्रसाद म्हणाले, गायीच्या ओळखपत्रातील माहिती तसेच त्यांचे ब्रीड व दूध उत्पादनासंदर्भातला डेटा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे दिला जाणार आहे. त्यासाठीचे सॉफटवेअर तयार झाले आहे. डिसेंबरपासून ओळखपत्रे देण्याचे काम सुरू होत असून ते सुरवातीला ८ जिल्ह्यात सुरू होईल.

झारखंडमध्ये सध्या ४२ लाख दूध देणारी जनावरे असून त्यातील ७० टक्के गायी आहेत. येथील प्रादेशिक गोशाला संघाने गायींसाठी पहिलीवहिली अॅम्बुलन्ससेवा नुकतीच सुरू केली आहे.

Leave a Comment