अल्लादिनच्या जीनपेक्षा सरस कामे करेल निकी अॅप

niki
अरबी सुरसकथातून आपल्याला माहिती झालेला अल्लादिनच्या जादूच्या दिव्यातील राक्षस तीन इच्छा पूर्ण करणारा असतो मात्र भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी तयार केलेले निकी अॅप युजरच्या अनेक इच्छा पूर्ण करू शकणार आहे. हे अॅप आर्टिफिशियल इंटेलिजन्सने परिपूर्ण आहे आणि युजरसाठी ते पर्सनल असिस्टंटसारखी कामे करणार आहे.

निकीचे सहसंस्थापक आणि सीईओ सचिन जायस्वाल या संदर्भात माहिती देताना म्हणाले, हे अॅप वापरण्यासाठी युजरला फक्त चॅट अॅप वापरावे लागेल. या एकाच अॅपच्या मदतीने कॅब बुकींग, युटिलीटी बिल पेमेंट, बस बुकींग, मोबाईल फोन रिचार्ज सारखी अनेक कामे करता येत आहेत. आत्तापर्यंत १७०० जणांनी हे अॅप अॅपल स्टोअरमधून डाऊनलोड केले आहे. या सुविधा देणारी अन्य अॅपही उपलब्थ आहेत मात्र प्रत्येक कामासाठी वेगळे अॅप घ्यावे लागते व त्यामुळे स्मार्टफोनमधील मेमरी व्यापली जाते. निकी अॅपमुळे अन्य अॅपची गरज संपुष्टात येईल आणि फोनच्या मेमरीची जागाही व्यापली जाणार नाही.

निकी अॅप हे ऑटोमेटेड अॅप आहे. हे अॅप युजरच्या सवयी आणि गरजा कांही काळात माहिती करून घेते. त्याला मशीन लर्निंग असे म्हटले जाते. त्यानंतर हे अॅप आपण होऊनच एखाद्या पर्सनल सेक्रेटरीसारखी युजरची कामे करू शकते.

Leave a Comment