मुंबई- महिन्द्रा अॅन्ड महिंन्द्रा जगविख्यात फेरारी या गाड्यांसाठी डिझाईन करणार्या पिनिनफेरिना या डिझाईन कंपनीची खरेदी करणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून गेले कांही दिवस या संदर्भात होत असलेल्या चर्चेला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. फेरारीची सर्व मॉडेल्स या डिझाईन हाऊसनेच तयार केली होती.
महिन्द्रा करणार पिनिनफेरिनाचे अधिग्रहण
या करारासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता येत्या कांही दिवसांत पूर्ण केली जात असल्याचे पिनिनफेरिना मधील वरीष्ठांनी जाहीर केले आहे. हे डक्षल लांबण्यामागे या डिझाईन हाऊसवर असलेले ८.७ कोटी युरो डॉलर्सचे कर्ज कारणीभूत ठरल्याचेही सांगितले जात आहे. सध्या या कंपनीवर फिनकार कंपनीचे नियंत्रण आहे व गुंतवणूकदारानी या डीलबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र महिद्राकडून मिळणारी रक्कम वाहन डिझाईन बनविणार्या या प्रसिद्ध इटालियन कंपनीला नवजीवन देण्यासाठीच खर्च केली जाईल असे जाहीर केले गेले आहे.