न्यूयॉर्क : ट्रॅकफोन ब्रॅण्डचा अँड्रॉईड एलजी स्मार्टफोन अमेरिकेची रिटेलर वॉलमार्टमध्ये अवघ्या ६५० रुपयांमध्ये मिळत आहे. शिवाय याची शिपिंगही अमेरिकेत फ्री आहे. मात्र या फोनमध्ये अँड्रॉईडचे जुनं व्हर्जन किटकॅट आहे, परंतु याचे स्पेसिफिशन ओरिजनल आयफोन पेक्षा चांगले आहेत.
एलजीचा केवळ ६५० रुपयांत स्मार्टफोन!
एलजी प्रिपेड लकी एलजी १६ या स्मार्टफोनची स्क्रीन ३.८ इंचाची आहे. १.२ गिगाहर्त्झ ड्यूएल कोर प्रोसेसर, ३ मेगापिक्सेल कॅमेरा या फोनमध्ये आहे.
याशिवाय फोनमध्ये ४ जीबी मायक्रो एसडी कार्ड असून ते फोनमध्येच इनबिल्ट आहे. फोनची मेमरी कार्डद्वारे ३२ जीबी पर्यंत एक्स्पांड करता येऊ शकते. या फोनमध्ये ९.९ दिवसांची स्टॅण्डबाय बॅटरी बॅकअप, शिवाय ७.३ तासाचा टॉकटाईम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कनेक्टिव्हिटीसाटी वायफाय आणि ब्लूटूथ आहे. तसंच प्रॉक्झिमिटी सेन्सर आणि एमपी३ प्लेअरही फोनमध्ये आहे.
वॉलमार्टच्या वेबसाईटवरुन सध्या हा फोन सोल्ड आउट आहे. परंतु वॉलमार्ट स्टोअर्समधून हा फोन खरेदी करता येऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे या फोनमध्ये अँड्रॉईडचे नवे अपडेट मिळणार नाही.