फिकी पडली सोन्या-चांदीची झळाळी

gold
नवी दिल्ली : सोने आणि चांदी सणासुदीच्या दिवसांत खरेदी करण्याची इच्छा सर्वांनाच असते आणि अजून ही संधी शोधत असाल… तर हीच आहे योग्य संधी… खरेदीदारांसाठी खुशखबर आहे. सोन्या-चांदीच्या भावाने गेल्या तीन महिन्यांतला निचांक गाठला आहे.

जागतिक स्तरावर क्रूड ऑईलच्या किंमती घसरण्यासोबतच २४ कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी २५,८०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. तर चांदीचा भाव ३४,५०० रुपये प्रतिकिलोग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या भावांत गेल्या तीन महिन्यांत जवळपास २५०० रुपये प्रतिकिलोग्रॅम घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोन्या-चांदीत गुंतवणूक करायची हीच योग्य संधी आहे. येत्या काळात लग्नाचाही सीझन जवळच आहे. त्यामुळे, ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलेली दिसते आहे. सराफांच्या म्हणण्यानुसार, सोन्या-चांदीची मागणी ग्राहकांकडून कायम आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारांत होणा-या बदलांमुळे सोन्या-चांदीच्या भावांत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

Leave a Comment