पेट्रोल, डिझेलने मोडले आणखी कंबरडे

petrol
नवी दिल्ली- देशातील पेट्रोल व डिझेलच्या किमतीत जागतिक पातळीवर इंधनाचे दर वाढल्याने वाढ झाली असून पेट्रोल लिटरमागे ३६ पैसे तर डिझेल ८७ पैशांनी महाग झाले आहे. हे दर रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

मुंबईत पेट्रोलचा नवीन दर ६१.०६ रुपये तर डिझेलचा नवीन दर ५४.०४ रुपये असेल. गेल्या पाच महिन्यांत पेट्रोलच्या दरात पहिल्यांदाच वाढ झाली आहे. तर ऑक्टोबरपासून आतापर्यंत डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत लिटरमागे ६१.०६ रु. असेल, असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने सांगितले.

जागतिक पातळीवर तेलाच्या किमती वाढल्या असून रुपया-डॉलर्सच्या विनिमय दराच्या परिणामामुळे तेलाच्या किमतीत वधारणा झाली. त्यामुळे ती दरवाढ ग्राहकांना सहन करावी लागेल, असे कंपनीने सांगितले.

Leave a Comment