जनतेशी संपर्क साधण्यासाठी ओबामांचे फेसबुक पेज !

obama
वॉशिग्टन : आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी कोणालाही सहज संपर्क साधता येईल. ओबामा यांच्याशी संपर्क साधण्याबरोबरच त्यांच्या पोस्टना लाईक्स देणे किंवा शेअर करण्यासाठी ओबामा यांनी ‘प्रेसिडेंट ओबामा’ या नावाने नवे फेसबुकपेज सुरू केले आहे.

हे फेसबुक पेज बराक ओबामा आणि पोटस या दोन पेजपेक्षा वेगळे आहे. या पेजवरून ओबामा यांच्याशी थेट संवाद साधता येऊ शकतो.

हॅलो फेसबुक. अखेर मला माझे फेसबुक पेज मिळाले. या पेजवर आपल्या देशासंदर्भात अधिक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करू शकेन अशी मला आशा आहे. या पेजवर तुम्ही सर्वजण तुमचे विचार मांडू शकता. माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि इथे तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनुभवही मांडू शकता अशी ओबामा यांनी या पेजवरची पहिली पोस्ट केली. पुढे ते लिहीतात, ही आपल्यातल्या संभाषणाची मी सुरूवात करतो. मी रोज रात्री जेवणापूर्वी या ठिकाणी काही वेळ चालत फे-या मारतो. त्यांच्या या पोस्ट नंतर फेसबुकचे मुख्य मार्क झुकेरबर्ग म्हणाला, ओबामा आपले या फेसबुक कुटुंबात स्वागत आहे. मला आनंद होतोय, की तुम्हीही माझ्या या कुटुंबाचा एक भाग बनला आहात. तुमच्या पेजवर तुम्ही लोकांशी कसा संपर्क साधता हे मी नक्की पाहेन. ओबामा यांनी या फेसबुक पेजवर त्यांचे काही फोटोही अपलोड केले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताना, पत्नी मिशेलसह काही जुन्या आठवणी आणि आई सोबतचा लहानपणीचा फोटो असे काही फोटो या पेजवर आहेत. पेज सुरू केल्यानंतर काही तासात ४ लाख ८९ हजार ३९८ लोकांनी या पेजला लाईक केले आहे. यापेजवर पिता, पती आणि अमेरिकेचे ४४ वे राष्ट्रध्यक्ष असा ओबामा यांनी स्वत:चा उल्लेख केला आहे.

Leave a Comment