शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये एक अब्ज डॉलर्सची विक्री !

alibaba
बीजिंग : ई-कॉमर्समधील सर्वांत मोठा शॉपिंग फेस्टिव्हल असे बिरुद मिरविणा-या अलिबाबा डॉट कॉमच्या सिंगल्स डेमध्ये पहिल्या आठ मिनिटांमध्येच तब्बल एक अब्ज डॉलरची विक्री झाली.

बीजिंमधील स्थानिक प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२ पासून शॉपिंग फेस्टिव्हलला सुरवात झाली आहे. अमेरिकेच्या सायबर मंडे या शॉपिंग फेस्टिव्हललाही चीनने भरपूर मागे टाकले आहे. चीनमध्ये दरवर्षी ११ नोव्हेंबरला अलिबाबातर्फे सिंगल्स ड साजरा केला जातो.गेल्या वर्षी अमेरिकेच्या सायबर मंड या सर्वांत मोठ्या ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये एका दिवसामध्ये दोन अब्जांहून अधिक डॉलरची विक्री झाली होती. तर यंदाच्या अलिबाबाच्या सिंगल्स डेमध्ये बुधवारी सकाळी ८ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ६.५६ अब्ज डॉलरची विक्री झाली होती. गेल्या वर्षी २४ तासांमध्ये अलिबाबाने एकूण ९.३ अब्ज डॉलरची विक्री केली होती. यंदा हा आकडा १२ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये अलिबाबाला मिळालेल्या प्रतिसादामध्ये वेगाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये एका तासामध्ये १.८ अब्ज डॉलरची विक्री झाली होती.

Leave a Comment