फेसबुक आणणार आहे नवे फीचर !

facebook
मुंबई : आपल्या मेसेंजरमध्ये फोटो मॅजिक फीचरचे फेसबुक टेस्टिंग करत असून, याद्वारे मित्रांचे चेहरे ओळखून त्यांना पाठवण्याचा ऑप्शन देणार आहे.
उदाहरणार्थ तुमच्या मित्रांचा जर तुम्ही फोटो क्लिक केला आणि त्यांना मेसेज पाठवायला विसरलात, तर फेसबुक मॅसेंजर त्याचवेळी मित्रांचे चेहरे ओळखून नोटिफिकेशनद्वारे त्यांना पाठवण्याचा ऑप्शन देणार आहे.

पण अशाप्रकारचे फीचर्स अनेक तज्ज्ञांच्या मते प्रायव्हसी पसंत करणाऱ्या युझर्ससाठी त्रासदायक ठरु शकतात. हे अपग्रेडेशन युझर्सना पर्सनल आयुष्यात घुसखोरीसारखे वाटत आहे.

फेशियल रिकग्निशनद्वारे फेसबुकचे हे नवे फीचर काम करणार आहे, मात्र याचा प्रायव्हसीला धोका असल्याचे सायबर एक्सपर्टचे मत आहे. दरम्यान, पहिल्यापासून फेशियल रिकग्निशनचा फेसबुक वापर करत असल्यामुळे अनेक देशांमध्ये याविरोधात खटलाही सुरु आहे.

हे फीचर सध्या टेस्टिंगच्या टप्प्यात आहे, पण ऑस्ट्रेलियामध्ये काही अँड्रॉईड युझर्ससाठी हे जारी केले गेले आहे. काही दिवसांनंतर हे फीचर आयओएससाठीही लॉन्च करण्यात येईल.

Leave a Comment