काचीगुडा ते शिर्डी धावणार विशेष ट्रेन

shirdi
अहमदनगर – प्रवाशांची दिवाळी सुट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने काचीगुडा-शिर्डी विशेष गाडीच्या सहा फेर्‍या वाढविण्याचे नियोजन केल्यामुळे या मार्गावर गर्दीचा सामना करणार्‍या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ही गाडी नांदेड, औरंगाबाद मार्गे धावणार आहे.

ही गाडी काचीगुडा येथून दिनांक १०, १७ आणि २४ नोव्हेंबर रोजी मंगळवारी रात्री १०.४५ वाजता सुटून शिर्डी येथे दुसर्‍या दिवशी दुपारी १२.१५ वाजता पोहोचेल. काचीगुडा येथून सुटल्यानंतर कामारेड्डी, निजामाबाद, मुदखेड,मार्गे नांदेड स्थानकावर पहाटे ३.३५ वाजता पोहचेल. पुढे पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, नगरसोल, मनमाड मार्गे ही गाडी शिर्डी ला पोहचणार आहे. परतीच्या प्रवासात शिर्डी येथून ११, १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी रात्री ७.१० वाजता निघून काचीगुडा येथे दुसर्‍या दिवशी पोहोचेल. शिर्डी येथून रात्री ७.१० वाजता निघालेली विशेष गाडी कोपरगाव येथून – ८.१०, मनमाड- ९.२०, नगरसोल-१०.०७, औरंगाबाद-११.२५, जालना येथून मध्यरात्री १२.२० वाजता, परभणी-२.२०, पूर्णा- पहाटे ३.०५, नांदेड येथून पहाटे ३.४५ ला सुटून मुदखेड, निजामाबाद मार्गे काचीगुडा येथे सकाळी ९.३५ वाजता पोहोचेल. सदरील गाडीला १८ डब्बे असणार आहेत.

Leave a Comment