देशातील टॉप टेन होलसेल मार्केटस

[nextpage title=”देशातील टॉप टेन होलसेल मार्केटस”]
colllarge
दिवाळी आता अगदी उंबरठ्यावर आली असताना देशभरातील नागरिक दिवाळीसाठीच्या खरेदीत गुंतले आहेत. खरेदीशिवाय दिवाळी ही कल्पनाच भारतीय करू शकत नाहीत. मग ती अगदी कपड्यांची असो, दागिन्यांची असो, फटक्यांची असो, लाईट माळांची असो, शुभेच्छा पत्रांची असो अथवा आणखी कशाची असो. ग्राहकांच्या सर्व मागण्या पुर्‍या करण्याची तयारी देशातील दुकानदारांनी त्यापूर्वीच सुरू केली आहे. ग्राहकांना हवा तो माल त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी दुकानदारांनाही खरेदी करावी लागतेच. आज या लेखात देशातील दहा टॉप टेन होलसेल मार्केटची माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

1-chandni-chowk
१)चांदणी चौक
जुन्या दिल्लीतील हे फार जुने मार्केट. येथे खरेदीसाठी देशभरातले दुकानदार येत असतात. हे मार्केट म्हणजे विविध प्रकारच्या वस्तू विकणार्‍या छोट्या छोट्या होलसेल मार्केटचा समूह आहे. प्रामुख्याने येथे कपडे व ज्वेलरी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर य्यापारी खरेदी करतात. अनेक आयातदारही येथूनच सामान घेतात. येथे साडी व्यवसाय जोरात आहे आणि डिझायनर ज्वेलरीचे हे मोठे मार्केट आहे.[nextpage title=”२) लजपतराय मार्केट”]

2-lajpatrai-market
जुनी दिल्लीतील लाल किल्लयासमोर असलेले हे होलसेल मार्केट इलेक्ट्राॅनिक्स व इलेक्ट्रीकल वस्तू, फॅन्सी लाईट, चीनी दिवे, माळा, त्याचबरोबर लोकल मेड एलईडी टीव्ही व फ्रिजसाठी प्रसिद्ध आहे. [nextpage title=”३)चावडी बाजार”]

3-chawari-bazar
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ असलेले हे होलसेल मार्केट पेपर कार्डस, ब्रास व तांबा वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. १८४० सालापासून हे मार्केट सुरू असून प्रथम ते हार्डवेअरसाठीचे मार्केट होते. आज मात्र येथे पेपर प्रॉडक्ट अधिक प्रमाणात आहेत. दिवाळी, लग्नसमारंभासाठी वॉलपेपर्स मिळण्याचे देशातले हे सर्वात मोठे होलसेल मार्केट आहे.[nextpage title=”४)सदर बझार”]

4-sadar-bazar
मध्य दिल्लीतील हे होलसेल मार्केट केवळ देशातीलच नव्हे तर अशियातील सर्वात मोठे होलसेल मार्केट आहे. येथे फटाक्यांची उलाढाला प्रचंड प्रमाणात होते. तसेच गृहोपयोगी वस्तूंपासून फॅन्सी ज्वेलरीपर्यंत, खेळणी, कॉस्मेटिक्स, अशा सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. येथे कारखान्यातून थेट माल येतो. येथे शिवकाशी येथील कारखान्यांतून थेट फटाके आणले जातात.[nextpage title=”५)क्रॉफर्ड मार्केट”]

5-crawfor-market
देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईतील हे मार्केट मुंबई पोलिस मुख्यालयासमोर आहे. हे महाराष्ट्राचे होलसेल मार्केट आहे. येथे अनेक वस्तू मिळतातच पण भाज्या, फळे, फुलेही होलसेलने मिळतात. कपडे, ड्रेस मटेरियल, खोटे दागिने, प्रवासी बॅगंाची ही होलसेल बाजारपेठ आहे. येथे जवळच जव्हेरी बाजार असून ते सोने, हिरे दागिन्यांचे सर्वात मोठे केंद्र आहे.[nextpage title=”६)मंगलदास मार्केट”]

6-mangaldas-market
गुजराथेतील व्यापारी अधिक संख्येने असलेले हे मुंबईतील मार्केट क्रॉफर्ड मार्केटजवळ आहे. येथे प्रामुख्याने गुजराथेत उत्पादन झालेल्या साड्या, ड्रेस मटेरियल, फॅब्रिक मिळते. येथे खरेदीसाठी गोवा, कर्नाटक व आंध्रातील व्यापारीही येतात.[nextpage title=”७)सुरत”]

7-surat-market
हे सगळे शहरच मुळी टेस्क्टाईल आणि डायमंडसाठी देशात प्रसिद्ध आहे.१९०१ सालापासून येथे हिरे कटिग व पॉलिशिंगचा व्यवसाय सुरू झाला व आज तो देशातील मोठा उद्योग आहे. दिवाळीच्या काळात येथे कोट्यावधींची उलाढाल होते. ही सिल्क सिटीही आहे तसेच येथील कॉटन कपडाही प्रसिद्ध आहे. येथे ८०० पेक्षा अधिक टेक्स्टाईल होलसेलर्स असून येथून प्रामुख्याने सिंथेटिक साड्या मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात. दरवर्षी ९ कोटींहून अधिक साड्या व ड्रेस मटेरियल येथे विकली जातात.[nextpage title=”८)लुधियाना”]

8-ludhiana-market
पंजाबमधील लुधियाना हे ऑटो इंडस्ट्री व वुलन मार्केटसाठी देशभरात प्रसिद्ध असून येथे सायकली, दुचाकी व बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारख्या महागड्या गाड्यांचे सुटे भाग होलसेलमध्ये मिळतात. तसेच फिरोज गांधी मार्केट लोकरी कपडे, स्वेटर्स, सूटस, जॅकेटसचे होलसेल मार्केट आहे.[nextpage title=”९) आर्ट अॅन्ड ज्वेलरी मार्केट”]

9-art-&-jewellary-market
जयपूर मधील हे मार्केट हवामहल या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ आहे. येथील कुंदर ज्वेलरी जगात प्रसिद्ध आहे. तसेच कार्पेट, टेक्स्टाईल, लेदर गुडस, हँडीक्राफ्ट, जेम्स, पॉटरी, विविध प्रकारचा आकर्षक बांगड्या यासाठी देशभरातील व्यापारी येथे खरेदीसाठी येतात. येथे फटाक्यांचाही मोठा बाजार आहे.[nextpage title=”१०)बडा बाजार”]

10-bura-bazar
कोलकाता येथील हा बाजार हुगळी नदीच्या काठावर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे होलसेल मार्केट पूर्व भारतातील मोठे मार्केट आहे. विशेष म्हणजे ग्राहकाला जे हवे ते सारे या मार्केटमध्ये मिळते. दिवाळी, दुर्गापूजा अशा मोठ्या सणांना येथे व्यापार्‍यांची प्रचंड गर्दी खरेदीसाठी होते.

Leave a Comment