जगातील सुरक्षित शहरे

[nextpage title=”जगातील सुरक्षित शहरे”]
collarge
जीवन म्हणजे एक प्रवासच असतो. कुठून सुरू झाला हे माहिती असले तरी कुठे संपणार याची मात्र जाणीव नसणारा प्रवास. त्यामुळे या अनिश्चित प्रवासात करायलाच हव्यात अशा कांही गोष्टी असतात त्यातली महत्त्वाच्या यादीतील एक म्हणजे प्रवास. हा प्रवास म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी केलेले प्रवास. आपल्या गावातून दुसर्‍या गावी, देशी जाण्याची पाळी अनेकांना येते. कधी कामासाठी, कधी रोजगारासाठी तर कधी पर्यटनासाठी तर कधी न टाळता येणार्‍या परिस्थितीसाठी. म्हणजे देशातील दंग्यांना युद्धांना कंटाळून जीव वाचविण्यासाठी करावे लागणारे स्थलांतर. अशा प्रवासाची वेळ मात्र कुणावरच येऊ नये असे वाटते.

जेथे जायचे ते गांव, शहर सुरक्षित असावे म्हणजे एकट्या दुकट्याला अनोखळी गावात फिरतानाही सुरक्षित वाटावे असे कुणालाही वाटते. जगभरात प्रवासासाठी अतिशय धोकादायक अशा जागा आहेत, तशीच अतिशय सुरक्षित स्थळेही आहेत. त्याचीच ही माहिती.

1-Copenhagen,-Denmark
१)कोपनहेगन
डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हे युरोप खंडातील सर्वाधिक सुरक्षित शहर समजले जाते. केवळ पर्यटनासाठीच नाही तर कायम राहण्यासाठीही ते सुरक्षित आहे. गेल्या कांही वर्षात शहराच्या कांही भागात गुन्हेगारी वाढत चालली असल्याचे दिसत असले तरीही हे शहर सुरक्षित आहे. दंगा मारामारी होत असली तर ती र्गंग रिलेटेड असते त्याचा अन्य लोकाना उपद्रव होत नाही. पाकिटमारी, किरकोळ चोर्‍यांची संख्या हातावरच्या बोटांइतकीच. सध्या मात्र या शहराला वर्णद्वेषातून होत असलेल्या हिंसात्मक घटनांचे गालबोट लागले आहे.[nextpage title=”२) म्युनिच”]

2-Munich,-Germany
बेवेरिया प्रांतातले हे तीन नंबरचे मोठे शहर. लोकसंख्येची दाटी असलेले. या शहरातच आठ जिल्हे आहेत आणि या शहराला १०० वर्षांपेक्षाही जुना ऐतिहासिक वारसाही आहे. इतिहास, संस्कृती आणि वास्तुरचनेने श्रीमंत असलेल्या या ठिकाणाला युरोपमध्ये सर्वाधिक पंसती दिली जाते. सध्या ही पसंती येथील बिअर त्यातही आक्टोबर फेस्ट व फुटबॉल मुळे मिळते आहे. दरवर्षी या शहराला किमान ७० लाख प्रवासी भेट देतात. येथील एफसी बायर्स म्युनिच फुटबॉल टीमला समर्थन करण्यासाठीही मोठ्या संख्येने जगभरातले प्रेक्षक सीझनमध्ये उपस्थित राहतात. हे शहर केवळ जर्मनीतीलच नव्हे तर पश्चिम युरोपमधले सुरक्षित शहर मानले जाते. आजकाल स्थलांतर करून आलेल्या गे समुदायाचा उपद्रव येथे होतो आहे.[nextpage title=”३)सेओल “]

3-Seoul,-South-Korea
दक्षिण कोरियाची राजधानी असलेले सेओल हे जगातील कांही मोठ्या शहरांपैकी एक आहे. येथील उपनगरांत कोटीहून अधिक लोक राहतात तर मुख्य शहराची लोकसंख्या अडीच कोटींवर आहे. इतकी लोकसंख्या असूनही येथे गुन्हेगारीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अगदी किरकोळ चोर्‍याही फारशा नाहीत. शहरातील जुन्या पिढीतील नागरिकांना बाहेरच्या लोकांनी येथे येणे फारसे रूचत नाही मात्र नवी पिढी त्याला अपवाद आहे. पर्यटकांनी या शहराला भेट द्यायलाच हवी अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. मोठमोठी उद्याने, देवळे, पर्वतशिखरे तसेच निशाजीवनही येथील मु्ख्य आकर्षण. पैसा मिळविण्यासाठी उत्सुक लोकांना येथे इंग्रजी शिकवण्या करून भरपूर कमाईची संधी आहे.[nextpage title=”४)रेकजाव्हिक, आईसलँड”]

4-Reykjavik,-Iceland
हा छोटासा देशच मुळी सर्वाधिक सुरक्षित देश आहे. हा देश म्हणजे छोटेसे बेट आहे व रेकजाव्हिक त्याची राजधानी. केवळ २ लाख लोकसंख्या मात्र अपूर्व निसर्गसौंदर्याची देणगी या शहराला लाभली आहे. व्हेलचे दर्शन, जिओ थर्मल सरोवर आणि वर्षाच्या कांही काळातच पाहायला मिळणारा अद्भूत र्नार्दन लाईटसचा नजारा ही याची श्रीमंती. हा देश म्हणजे अटलांटिक समुद्रातला देखणा हिरा आहे. येथले नागरिकही अतिशय मनमिळावू, सहज मैत्री करणारे आहेत. ज्यांची पर्यटन किवा प्रवास म्हणजे त्या त्या ठिकाणी मद्यपान करणे अशी कल्पना आहे त्यांची येथे थोडी अडचण होऊ शकते. येथे दारू अतिशय महाग आहे.[nextpage title=”५)स्टॉकहोम, स्वीडन”]

5-Stockholm,-Sweden
स्वीडनची राजधानी असलेले हे शहर म्हणजे १४ बेटांचा पुंजका.२० लाख लोकवस्ती असलेल्या या शहराचा क्राईम रेट अगदी नगण्य आहे. मारामार्‍या, हिंसाचार अशा घटना जवळजवळ नाहीतच.कांही ठिकाणी अलिकडे र्गंगवॉर झाल्या पण सर्वसामान्य नागरिक अथवा पर्यटकांना त्यापासून धोका नाही. शहराच्या ३० टक्के भागात हिरवाई आहेच पण येथील पाणवाटा अतिशय देखण्या आहेत. शहराला ८०० वर्षांचा इतिहास आहे आणि स्विडीश डेथ मेलचे हे जन्मस्थान आहे. आजही या क्लासिक बँडचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात. मुळाच येथील बर्‍याच नागरिकांना इंग्रजी येते त्यामुळे बाहेरून आलेल्यांना संवाद साधणे फारसे अवघड जात नाही.[nextpage title=”६)अॅमस्टरडॅम”]

6-Amsterdam,-the-Netherland
नेदरलँडची राजधानी अॅमस्टरडॅम हे जगातील सर्वाधिक वैयकितक सुरक्षा देणारे शहर म्हणून ओळखले जाते. सुरक्षित २५ शहरांच्या यादीत या शहराचा नंबर बराच वरचा लागतो आणि कित्येक वर्षे हे स्थान असेच कायम आहे. एकट्या दुकट्या महिला पर्यटकांसाठीही हे शहर अतिशय सुरक्षित आहे. येथील रेड लाईट एरिया प्रचंड मोठा आहे, तेथे क्वचित मारामार्‍यांचे प्रसंग घडतात मात्र तरीही येथे दंगे, हिंसाचार फारसा नाही.[nextpage title=”७) झुरीच”]

7-Zurich,-Switzerland
स्वित्झर्लंडची आर्थिक राजधानी ही या शहराची खरी ओळख. देशातले हे मोठे शहर पर्यटकांचेही अत्यंत आवडते स्थळ आहे. जर्मन भाषिक येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. येथील वास्तूरचना, म्युझियम्स, निसर्गसौदर्य, रिव्हर लिम्मन आणि लेक झुरीच हे या शहराचे जणू दागिने. येथील राहणीमान महाग आहे तरीही पर्यटक मोठ्या संख्येने येतात. आजकाल येथील निशाजीवनही फुलू लागले आहे मात्र हा आनंद सुरक्षितपणे घेण्याची खात्री येथे असते. गुन्हे अजिबात नाहीत असे नाही, रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी कांही वेळा पाकिटमारी, किरकोळ चोर्‍यांच्या घटना घडतात.[nextpage title=”८)डब्रोव्हनिक”]

8-Dubrovnik,-Croatia
क्रोएशियातील फक्त ४०हजार लोकसंख्येचे हे शहर पर्ल ऑफ अँड्रीएटिक ओशन म्हणूनच जगाला परिचित आहे. पर्यटन हाच येथला मुख्य व्यवसाय. या शहराची ऐतिहासिक श्रीमंती लाजबाब आहे. सुंदर किनारपट्टी, तटबंदी असलेले मध्ययुगातील बलाढ्य शहर ही याची सौंदर्यस्थळे. युगोस्लाव्हियातील युद्धाचा थोडा विपरित परिणाम या देखण्या शहरावर झाला आहे. १९९० च्या युद्धातील बंदुकींच्या गोळ्यांच्या खुणा अजूनही पाहता येतात. मात्र तरीही हे शहर पर्यटकांसाठी सुरक्षित आहे. अर्थात या शहारात एक मोठा धोका आहे तो म्हणजे येथले निसरडे रस्ते. ती काळजी घेतली तर बाकी धोका नाही.[nextpage title=”९) सिंगापूर”]

9-Singapore,-Singapore
जगातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचे दोन नंबरचे शहर अतिशय सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. ब्रिटीश वसाहतीचे हे शहर म्हणजे बेट आहे. ६० लाख लोकसंख्येच्या या शहरात ५० टक्के हिरवाई जपली गेली आहे. पर्यटकही येथे मोठ्या संख्येने येतात मात्र येथे निशाजीवन फारसे नाही. तरीही आग्नेय आशियातील या शहरात कॅसिनो आणि साहसी खेळांचा आनंद लुटता येतो. आतिशय स्वच्छ आणि फ्रेडली असलेल्या या शहरात कायदे अतिशय कडक आहेत त्यामुळेही ते सुरक्षित राहिले आहे. येथे अमली पदार्थ खरेदी विक्रीच्या गुन्ह्याला थेट मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. तसेच शहराच च्युईंगम विक्रीला बंदी आहे.[nextpage title=”१०) टोक्यो”]

10-Tokyo,-Japan
जगातले उसळते शहर अशी याची ओळख. शहराच्या मध्यवस्तीची लोकसंख्या साडेतीन कोटी आणि उपनगराची लोकसंख्या दीड कोटी. जपानचा एकूण आकार आणि उपलब्ध असलेला भूभाग पाहता ही गर्दी खूपच झाली. मात्र तरीही येथे येणार्‍या पर्यटकांचे टोक्यो हे मुख्य आकर्षण असते. पर्यटकाला हवे ते सारे देणारे, त्याची संास्कृतिक, भौगोलिक भूक भागवितानाच त्याला आधुनिक पाश्चिमात्य आणि पारंपारिक अशा सर्व परंपरांचे दर्शन येथे घडते. हे शहरही जगातले सर्वात सुरक्षित शहर आहे.

Leave a Comment