या गावाची लोकसंख्या फक्त दोन

spain
गर्दीच्या शहरातून एखाद्याला अगदी कमी वर्दळीच्या शहरात जाण्याची व राहण्याची वेळी आली तरी माणूस तेथे रमू शकणार नाही. कितीही एकांताची आवड असली तरी अवतीभोवती थोडाफार तरी गलबला असणे ही माणसाची मोठी गरज आहे. मात्र स्पेनमधील ला एस्टेला हे गांव आणि तेथे राहणारे जुआन मार्टिन व सिनफोरोसा हे वृद्ध जोडपे याला पूर्ण अपवाद आहे. या गावाचे गेली ४५ वर्षे हे जोडपे हे एकमेव रहिवासी आहेत.

१९३६ च्या गृहयुद्धात येथून हजारो लोक कामाच्या शोधात बाहेर पडले ते परत आले नाहीत. त्यावेळी या गावची लोकसंख्या २०० होती. त्यानंतर नैसर्गिक संकटाने या गावावर घाला घातला आणि उरलेसुरले नागरिकही निघून गेले. मात्र मार्टिन व सिनफोरोसा हे जोडपे या गावात इतके गुंतून गेले होते की त्यांनी हे गाव न सोडण्याचा निर्णय घेतला व आजतागायत तो पाळला आहे. त्यांच्यासोबत त्यांची कुत्री, मांजरे, कोंबड्या आहेत. हे जोडपे शेती करून आपला उदरनिर्वाह करते. आज मार्टिन ८० वर्षाचा तर त्यांची पत्नी ७९ वर्षची आहे.

पूर्वीच्या अनेक इमारती, चर्च, शाळा आजही या गावात आहेत. या गावाला तेव्हा महापौर होता, पोलिस होते, शिक्षक होते , पुजारी होते. मात्र नैसर्गिक संकटात त्यातील अनेकजण ठार झाले व त्यानंतर हे गांव पुन्हा गजबजलेच नाही. हे जोडप्याने मात्र या गावाची साथ सोडलेली नाही. ते येथे मधमाशी पालन करून मधही उत्पादन करतात.

Leave a Comment