जगातील सर्वात सुंदर समुद्र किनारे

[nextpage title=”जगातील सर्वात सुंदर समुद्र किनारे”]
collarge
समुद्र किनार्‍याचे आकर्षण अनेक पर्यटकांना असते. कांही कांही ठिकाणचे समुद्रकिनारे तर इतकी भुरळ घालतात की वेळ मिळाला की तेथे जावे, रिलॅक्स व्हावे आणि पुन्हा रोजच्या धबडग्याला सामोरे जाण्यासाठी हुश्शार व्हावे अशी इच्छा होते. मुळात समुद्र माणसाला वेड लावतो आणि त्याला सुंदर किनार्‍याची साथ असेल तर मग घी मे शक्कर. अर्थात असे समुद्र किनारे सतत गजबजलेलेही असतात. फक्त आपल्या स्वीटहार्टसोबत वेळ घालवायचा असेल तर असे किनारे फारसे उपयोगाचे नाहीत. आपल्या प्रणयाला अधिक गहीरे बनविणारे किनारेही आहेत की. जगभरातल्या अशा टॉप टेन सेक्सी बीचेसची ही माहिती खास प्रेमी युगलांसाठी

1-Grande-Plage-Biarritz
१)ग्रँड प्लॅग
फ्रान्सच्या ब्रायरिझ शहरातील हे ठिकाण केवळ फ्रेंचवासियांचेच नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांचेही आवडते स्थळ आहे. अत्यंत लोकप्रिय अशा या बीचभोवती शेकडो हॉटेल्स, लग्झरी डेस्टीनेशन्स, रेस्टॉरंटस आहेतच पण येथे पोहोचण्यासाठी विमान, रेल्वेची सुविधाही आहे. ग्रँड प्लॅग या शब्दाचा अर्थ सुंदर किनारा. प्रेमी युगलांसाठी येथे अनेक सोयी. सूर्यस्नानाचा मनमुराद आनंद लुटून दमला असाल तर करमणुकीसाठी आणि जमले तर थोडी कमाई करण्यासाठी दोन मोठे र्कसिनो येथे आहेत. येथील निशाजीवनही प्रसिद्ध आहे.[nextpage title=”२)बाँडी बीच”]

2-Bondi-Beach-–-Australia
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहराच्या उपनगराचा एक भाग असलेला बाँडी बीच आणि बाँडी बे समुद्रवेड्यांचा हॉट स्पॉट म्हणून ओळखला जातो.तुम्हाला थोडी धावण्याची आवड असेल तर ऑगस्ट महिना या किनार्‍याला भेट देण्यासाठी उत्तम कारण त्यावेळी येथे सिटी टू सर्फ फन रन असा उत्सव असतो. अर्थात वर्षभर कधीही या किनार्‍यावर जाऊन तुम्ही आनंद लुटू शकता. मात्र येथील समुद्र थोडा लहरी आहे त्यामुळे सुरक्षित व शांत पाणी हवे असेल तर उत्तरेकडचा किनारा त्यासाठी योग्य.[nextpage title=”३)अँग्रादिस रिस- कोस्टा व्हेर्डा-ब्राझील”]

3-Angra-Dos-Reis-–-Costa-Ve
या शब्दाचा अर्थच मुळी हिरवा किनारा असा आहे. तब्बल १७५ मैलांचा हा किनारा डायव्हिंग, स्विमिग, सूर्यस्नान, किवा अगदी नुसता आराम करण्यासाठीचे आदर्श स्थळ. सान पावलो आणि रिओ द जनेरो यांच्या मध्ये हा भाग येतो. अँग्रादिस रिस म्हणजे बे ऑफ किंग. येथील पाणी अतिशय नितळ आणि स्वच्छ आहे.[nextpage title=”४)मटोरा बीच, बोरा-बोरा-ताहिती”]

4-Matira-Beach-–-Bora-Bora
माहितीमधले बोरा बोरा बेट फ्रेंच पॉलिनेशियाचा भाग आहे. पॅसिफिक समुद्रातील हे बेट लगून्सनी वेढलेले आहे आणि त्यामुळे त्याच्या सौदर्यांत अधिकच भर पडली आहे. या बेटावर कायमचे रहिवासी अवघे ९ हजार आहेत आणि पर्यटकांवरच त्यांची कमाई अवलंबून असल्याने आलेल्या पर्यटकांची ते उत्तम बडदास्त ठेवतात. स्नॉकर्लिंग आणि स्कूबा डायव्हिंगची सुविधा येथे आहे मात्र बेटावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे भाड्याने घेतलेली कार किवा सायकलवरून भटकंती करावी लागते.[nextpage title=”५)ला डिग्यू बीचेस-सेशेल्स”]

5-La-Digue-Beaches-–-Seyche
सेशेल्स हा १५५ बेटांचा समूह हिद महासागरात आहे. पूर्व आफ्रिकेतील या बेटांत ला डिग्यू हे तीन नंबरचे मोठे बेट रोमॅटिक बीचसाठी प्रसिद्ध आहे. वन्य प्राणी दर्शनाबरोबरच येथील प्रवाळ बेटेही अवश्य पाहायला हवीत. तुम्ही डायवर असाल तर येथे तुम्हाला आनंद लुटण्याच्या अनेक संधी आहेत. अन्यथा सायकलवरून रमतगमत आपल्या जोडीदारासह बेटाची चक्कर मारा. तीही तितकीच आनंददायी आहे.[nextpage title=”६)द रिपब्लीक ऑफ मालदीव्ज”]

6-The-Republic-of-Maldives
मालदीव हा देशच मुळी समुद्र किनार्‍यांसाठी पर्यटकांत प्रसिद्ध आहे. माले या राजधानीच्या शहरापासून जवळ असलेल्या या बीचवर मोठा बाजार, रेस्टॉरंट, वॉटर स्पोर्टस अॅक्टीव्हीटीजची रेलचेल आहे. शेकडो बेटांचा समुह असलेल्या या देशात स्पीड बोट अथवा सीप्लेनने एका बेटावरून दुसरीकडे जाता येते. आलिशान रिसॉर्टस, स्पा तुमच्या तैनातीसाठी सज्ज आहेत.[nextpage title=”७) बे लग-सेंट मार्टिन”]

7-Baie-Longue-–-St.-Martin
येथे बहुतेक वेळा समुद्र उबदार असतो. फ्रेंच लॉलँडचा दक्षिण भाग असलेला हा बीच रमटिक स्ट्रेच म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय शांत असलेल्या या ठिकाणी डायव्हिंग, स्नॉर्कलिंग चा आनंद लुटता येतो.[nextpage title=”८)को फी फी डॉन आयलंड- थायलंड”]

8-Ko-Phi-Phi-Don-Island-Bea
फीफी बेटांवर तुम्हाला असे पाणी दिसेल की जे कुठल्याच समुद्रावर कधीच दिसणार नाही. हे एक मोठे बेट असून केवळ ३ हजार लोक येथे राहतात, दुर्देवाने या किनार्‍याच्या सौंदर्याचे २००४ च्या त्सुनामीत मोठेच नुकसान झाले मात्र आता ते हळूहळू भरून येऊ लागले आहे. समुद्रप्रेमीसाठी हा स्वर्ग आहे. फुकेत येथून फेरीबोटीने जाता येते. पर्यटकांची येथे कधीकधी खूपच गर्दी होते मात्र तरीही येथे वेळ मिळेल तेव्हा जायला हवेच.[nextpage title=”९) फॉल ग्रँडोस- ग्रीस”]

9-Folegandros-Beaches-Greec
ग्रीसमधले १२ चौरस मैल परिसराचे हे बेट ग्रीसच्या दक्षिण भागात आहे. येथे १ हजारांहून कमीच लोक कायम वस्तीला आहेत त्यामुळे बेटाचे नैसर्गिक सौंदर्य कायम टिकून राहिले आहे. चोरा नावाचे छोटेसे गांव खडकाच्या टोकावर वसलेले असले तरी तेथे कारने सहज जाता येते. ज्या प्रेमी युगलांना थोडा खासगीपणा आणि निवंातपणा हवा त्यांनी येथे जरूर भेट द्यावी.[nextpage title=”१०)टेनराईफ बीच”]

10-Tenerife-Beaches-Canary-
कॅनरी आयलंड – स्पेनमधील लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक. येथे जायचे असेल तर गर्दी असणार याची तयारी ठेवूनच प्रस्थान ठेवायचे. दरवर्षी सरासरी ५० लाख पर्यटक येथे भेट देतात. दोन विमानतळ, स्थनिक वाहतूकची सुविधा आहे. वर्षभर येथे सतत कांही ना कांही कार्यक्रम सुरू असतात. फेब्रुवारीत साजरा होणारा कार्निव्हल ऑफ सँटा क्रूझ द टेनेरिफ आवर्जून एन्जॉय करावा असा. एकांत सोडला तर बाकी सर्व या किनार्‍यावर मौजूद आहे.

Leave a Comment