स्टीलपेक्षा मजबूत काच बनविण्यात यश

glass
टोक्यो – जपानच्या विश्वविद्यालय व जपान सिक्रोटोन रेडिएशन रिसर्च संस्थेतील संशोधकांनी इतर धातू तसेच पोलादापेक्षाही मजबूत काच बनविण्यात यश मिळविले आहे. परिणामी सतत हातातून पडून काच फुटल्यामुळे स्मार्टफोनची दुरूस्ती करण्याचे दिवस आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

संशोधकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही काच तयार करताना एरोडायनामिक लेबिटेशन पदार्थाचा व अॅल्युमिनियम ऑक्साईड या पदार्थांचा वापर केला गेला आहे. यांच्या संयोगातून विशिष्ठ प्रक्रियेने तयार झालेली ही काच फुटणार नाही. गाड्यांच्या काचा, स्कायस्क्रॅपर, स्मार्टफोन, टॅब्लेटस यासाठी ही काच अतिशय उपयुक्त ठरेल असा त्यांचा दावा आहे. वास्तविक काच बनविण्याच्या प्रक्रियेत अल्यमिना या अॅल्युनिमियम संयुगाचा वापर पूर्वीपासूनच केला जातो मात्र या मिश्रणापासून बनलेल्या वस्तूंत हवा राहिल्यास अॅल्यमिना चे क्रिस्टल बनतात व त्यामुळे त्याचा काचेसारखा वापर करता येत नाही. हा दोष नवीन प्रक्रियेत दूर करण्यात आला आहे.

Leave a Comment