रेल्वे तिकीटे रद्द करणे पडणार महागात

railway
मुंबई- भारतीय रेल्वेने खरोखरीच नड असलेल्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे सुलभ जावे यासाठी रेल्वे तिकीट रद्द करणे अथवा रिफंड साठीचे नवे नियम तयार केले असून त्याची अमलबजावणी १२ नोव्हेंबरपासून होणार आहे. पूर्वी या सांठी जे दर निश्चित केले होते त्यापेक्षा दुप्पट रक्कम नवीन नियमांमुळे प्रवाशांना मोजावी लागणार आहे. म्हणजे तिकीटे रद्द करणे अथवा रिफंड घेणे महागात पडणार आहे.

नव्या नियमानुसार नियोजित रेल्वे स्टेशनवरून सुटल्यानंतर कोणत्याही प्रकारचा रिफंड प्रवाशांना मिळणार नाही. रिफंड हवा असेल तर रेल्वे सुटण्यापूर्वी किमान चार तास अगोदर त्याची सूचना प्रवाशांना द्यावी लागेल. कन्फर्म तिकीट रद्द करायचे असेल तर यापुढे ४८ तास अगोदर ही कारवाई करावी लागेल आणि त्यासाठी पूर्वीच्या सेकंड क्लास कन्फर्म कॅ न्सलेशनसाठी आकारल्या जाणार्‍या ३० रूपयांऐवजी ६० रू. आकारले जातील. थर्ड एसी साठी हा दर ९० वरून १८० रूपयांवर तर सेकंड एसी साठी १०० वरून २०० वर नेण्यात आला आहे. सेकंड स्लीपर क्लाससाठी हा दर ६० वरून १२० रूपयांवर नेला गेला आहे.

वेटींग लिस्ट आरएसी तिकीटांसाठी अर्धा तास अगोदर रिफंड मिळू शकेल मात्र त्यानंतर रिफंड मिळणार नाही.

Leave a Comment