भारतात सुरू झाली अ‍ॅपलच्या स्मार्ट वॉचची विक्री

aaple
नवी दिल्ली – शुक्रवारपासून ‘अ‍ॅपल वॉच’ची अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी अ‍ॅपलने भारतात विक्री करण्यास सुरुवात केली. भारतीयांना ३०,९९० रुपयांपासून १४ लाख रुपये हे हाय-टेक घडय़ाळ खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार आहेत.

वेळ दाखवण्याच्या पारंपरिक कामाबरोबरच संपर्क, मनोरंजन आणि वैयक्तिक आरोग्य सांभाळणारे हे हाय-टेक घडय़ाळ ३८ मिमी आणि ४२ मिमी अशा दोन प्रकारांत आणले आहे. ३८ मिमी प्रकारातील चंदेरी आवरण आणि सफेद स्पोर्ट बँड असलेल्या अ‍ॅपल वॉच स्पोर्टची किंमत ३०,९०० रुपयांपासून आहे. तर स्टेनलेस स्टील आवरणासह सफेद स्पोर्ट बँड असलेल्या अ‍ॅपल वॉचची किंमत ४८,९०० रुपये आहे. ४२ मिमी प्रकारातील हे घडय़ाळ अनुक्रमे ३४,९०० रुपये आणि ५२,९०० रुपयांपासून उपलब्ध आहे. ३८ मिमी प्रकारातील प्रिमियम मॉडेल असलेल्या अ‍ॅपल वॉच एडिशनची िमत ८.२ लाख रुपये आहे.

यामध्ये १८ कॅरेट गोल्डचे आवरण आण सफेद स्पार्ट बँड आहे. ४२ मिमीच्या प्रिमियम घडय़ाळाची किंमत १४ लाख रुपये आहे. देशभरात १०० अ‍ॅपल प्रिमियम रिटेल स्टोअरमधून या घडय़ाळाची विक्री केली जाणार आहे.

Leave a Comment