नवी दिल्ली – अगदी कंठाशी येईपर्यंत भारतीय रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केल्यामुळे आता यापुढे दरकपात करण्याला जराही वाव नसल्याचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे.
यापुढे दरकपात करण्याला जराही वाव नाही – रघुराम राजन
व्याजदर कपात करण्याची आता जराही संधी नसल्यामुळे सध्याचे व्याजदर योग्य आहेत, असे राजन यांनी म्हटले आहे. रिझर्व बँकेने मागच्या महिन्यातच ०.५ टक्के कपात करुन पतधोरण जाहीर केल्यामुळे संपूर्ण आर्थिक जगतालाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या निर्णयामुळे खासगी बँकाना व्याजदर कर्जावरील व्याजदर कमी करता आले. आता हे सध्या तरी शक्य नाही.